मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवान गडावर जाऊन महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर महंत नामदेव शास्त्री यांनी माध्यमांशी बोलताना, भगवान गड धनंजय मुंडे यांच्या भक्कमपणे पाठिशी असे म्हणाले. यावरुन आता राजकीय वर्तुळातून देखील अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आज सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख भगवान गडावर जाऊन महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेणार आहेत.
देशमुख हत्या प्रकरणातील पुरावे महंत नामदेव शास्त्री यांना दाखवण्यासाठी ते भगवानगडावर आज जाणार असून पाथर्डी मार्गे देशमुख कुटुंब भगवानगडाकडे निघणार असल्याची माहिती मिळत आहे.