Dipali Sayyed Team Lokshahi
ताज्या बातम्या

दिपाली सय्यद यांच्यावर गुन्हा दाखल करा; PM मोदींबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर BJP आक्रमक

सोमय्यांवरील हल्ल्यानंतर दिपाली सय्यद यांनी एक वक्तव्य केलं होतं, त्यामुळे भाजपने कारवाईची मागणी केली आहे.

Published by : Sudhir Kakde

पुणे | प्रमोद लांडे : भाजपनेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या वाहनावर काही दिवसांपूर्वी मुंबईत हल्ला झाला होता. राणा दाम्पत्याला भेटण्यासाठी गेलेल्या सोमय्यांवर शिवसैनिकांनी (Shivsena) खार पोलीस स्टेशन बाहेर हल्ला केला होता. त्यानंतर दिपाली सय्यद (Dipali Sayyed) यांनी सोमय्यांवर हल्लाबोल करताना एक वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्या आता भाजपच्या निशाण्यावर आहेत. शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याचं समर्थन करत दिपाली सय्यद म्हणाल्या होत्या की, सोमय्यांऐवजी त्या वाहनात मोदी (PM Narendra Modi) जरी असते तरी शिवसैनिकांनी हल्ला केला असता. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपकडून होतेय.

अभिनेत्री दिपाली सय्यद ह्या सध्याच्या परिस्थितीत भाजप पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांच्या वरील हल्ल्यानंतर अतिशय प्रक्षोभकपणे बोलून गुन्ह्याच समर्थन करत आहेत. त्यांच्या या विधानामुळे वाद निर्माण होऊ शकतो, त्यामुळे दिपाली सय्यद यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाजपने केली आहे. शिरुर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज शिक्रापूर पोलीस ठाण्यात याबद्दलचे निवेदन देण्यात आले आहे.

दरम्यान, जर पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल केला नाही तर भविष्यात आम्ही तीव्र आंदोलन करू असंही भाजप तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता दिपाली सय्यद यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

Latest Marathi News Update live : राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला?

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Pune Metro : पुणे मेट्रोच्या स्वारगेट–कात्रज मार्गावर दोन नवीन स्थानकांना मंजुरी