ताज्या बातम्या

नाशिक खासगी बस आणि टँकर अपघात : मृतांची ओळख पटविण्यासाठी डीएनए टेस्ट करणार - जिल्हाधिकारी

Published by : Siddhi Naringrekar

नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका येथे एका खासगी प्रवासी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत दहा ते बारा प्रवाशांचा जळून मृत्यू झाला आहे. तर मृतांची संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. तब्बल 10 ते 12 प्रवाशी या भीषण दुर्घटनेत जिवंत जळाले आहेत.

याच पार्श्वभूमीवर मृत झालेल्या प्रवाशांची ओळख पटत नसल्याने संबंधित मृतांच्या ओळखीसाठी डीएनए टेस्ट करण्यात येणार असून त्याचबरोबर इतर फॉरेंसिन्क टेस्ट काण्यात येणार असल्याची महिती नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी दिली आहे. त्याचबरोबर मृतांची ओळख पटविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मदत कक्ष तयार करण्यात आलं असून दोन तोल फ्री नंबरही देण्यात आले आहेत. अशी माहिती त्यांनी दिली आहे.

नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका या ठिकाणी हा मोठा अपघात झाला आहे. अपघातात 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 38 प्रवासी जखमी झाले आहेत. नाशिक जवळ नांदूर नाका येथे बसला आग लागून हा मोठा अपघात झाला आहे. ही बस यवतमाळकडून मुंबईकडे जात होती. या बसची एका ट्रकला धडक लागल्यामुळं आग लागली. बसने पेट घेतल्यानं त्यामधील काही प्रवाशांचा मृत्यू झाला.

Rohit Pawar: रोहित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले...

Rice Water: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या...

Naseem Khan: नसीम खान यांचा प्रचार समितीचा राजीनामा मागे

Beed: बीडमध्ये चंदन तस्करी; निवडणुकीच्या धामधुमीत दोन कोटींचे चंदन जप्त

Eknath Shinde On Wadettiwar: वड्डेटीवाराचं डोकं फिरलं आहे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जोरदार टीका