ताज्या बातम्या

'हर हर महादेव' सिनेमावर प्रतिक्रिया देऊ नका; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या प्रवक्त्यांना सूचना

Published by : Siddhi Naringrekar

छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोपावरुन हर हर महादेव या मराठी चित्रपटाला राज्यभरातून विरोध होत आहे. संभाजी ब्रिगेडच्यावतीने सकाळी पुण्यात हर हर महादेव चित्रपटाचे शो पाडण्यात आले आहे. त्यानंतर रात्री उशिरा ठाण्यामध्येही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनीही थेट चित्रपटगृहात घुसून चित्रपटगृह रिकामे करत हर हर महादेवचा शो बंद पाडला.

यावेळी आव्हाड आक्रमक झाले असून त्यांनी आपल्या कार्याकर्त्यांसह मल्टिप्लेक्समध्ये शिरत घोषणाबाजी करत शो बंद पाडला. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विनंती करून प्रेक्षकांनी चित्रपटागृहाबाहेर जाण्याची विनंती करीत होते. त्यावेळी काही प्रेक्षकांनी चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाकडे तिकिटाचे पैसे परत मागितले. त्यावेळी प्रेक्षक आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाल्याने त्या प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनसेच्या सर्व प्रवक्त्यांना या चित्रपटाबाबत न बोलण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत. चित्रपटाकडे चित्रपट म्हणून पाहणं गरजेचं आहे. असे राज ठाकरे यांनी सांगितले. हर हर महादेव या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे हे आज चित्रपटाबाबत भूमिका मांडणार आहेत. आज 11 वाजता अभिजित देशपांडे हे पत्रकार परिषद घेणार आहेत.

ठाण्याच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल, म्हणाले; " ज्यांनी बाळासाहेबांना अटक..."

IPL 2024, CSK vs RR : चेन्नई सुपर किंग्जच्या प्ले ऑफच्या आशा पल्लवीत; राजस्थानचा ५ विकेट्सने केला पराभव

Daily Horoscope 13 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांच्या आयुष्यात होतील सकारात्मक बदल; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 13 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

"...तर तुम्हाला गुलामगिरीत राहावं लागेल"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंचा PM मोदींवर निशाणा