ठाण्यात विवियाना मॉल राडाप्रकरणी जितेंद्र आव्हाडांच्या 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा

ठाण्यात विवियाना मॉल राडाप्रकरणी जितेंद्र आव्हाडांच्या 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा

छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोपावरुन हर हर महादेव या मराठी चित्रपटाला राज्यभरातून विरोध होत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोपावरुन हर हर महादेव या मराठी चित्रपटाला राज्यभरातून विरोध होत आहे. संभाजी ब्रिगेडच्यावतीने सकाळी पुण्यात हर हर महादेव चित्रपटाचे शो पाडण्यात आले आहे. त्यानंतर रात्री उशिरा ठाण्यामध्येही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनीही थेट चित्रपटगृहात घुसून चित्रपटगृह रिकामे करत हर हर महादेवचा शो बंद पाडला.

यावेळी आव्हाड आक्रमक झाले असून त्यांनी आपल्या कार्याकर्त्यांसह मल्टिप्लेक्समध्ये शिरत घोषणाबाजी करत शो बंद पाडला. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विनंती करून प्रेक्षकांनी चित्रपटागृहाबाहेर जाण्याची विनंती करीत होते. त्यावेळी काही प्रेक्षकांनी चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाकडे तिकिटाचे पैसे परत मागितले. त्यावेळी प्रेक्षक आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाल्याने त्या प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली.

याच पार्श्वभूमीवर आता विवियाना मॉलमधील राड्याप्रकरणी आव्हाड यांच्या 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झालाय. वर्तकनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवियाना मॉलमधील राड्याप्रकरणी आव्हाड यांच्या 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झालाय. वर्तकनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कलम 141,143,146, 149, 323, 504, मुंबई पोलीस कायदा कलम 37/135 आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी परीक्षित विजय धुर्वे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाण्यात विवियाना मॉल राडाप्रकरणी जितेंद्र आव्हाडांच्या 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा
ठाण्यात ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो राष्ट्रवादीने बंद पाडला; प्रेक्षकांना कार्यकर्त्यांकडून मारहाण
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com