मुंबईमधील उल्हासनगरमध्ये एक अजब प्रकार उघडकीस आला आहे. चक्क जीवंत माणसाला मृत घोषित केल्याचा प्रकार समोर आला आहे. उल्हासनगरमधील शिवनेरी हॉस्पिटलमधील ही घटना असून त्यांनी 65 वर्षाच्या अभिमान तायडे यांना जीवंत वक्तीला मृत घोषित करून व्यक्तीचे डेथ सर्टिफिकेट बनवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे अभिमान तायडे यांच्या नातेवाईकांनी या हॉस्पिटल प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. डॉक्टरच्या या निष्काळजीपणाच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
अभिनव तायडे गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थाच्या कारणामुले उपचार घेत होते. त्यांच्यावर आधीच मुंबईमधील रुग्णालयात उपचार झाले होते. मात्र काल ते आपल्या घरी असताना अचानक त्यांना चक्कर आली आणि ते बेशुद्ध पडले. त्यांच्या मुलाने तात्काळ त्यांना आपल्या रिक्षातून जवळच्या उल्हासनगरमधील शिवनेरी रुग्णालयात आणले. यावेळी तेथे डॉ. प्रभू अहुजा या रुग्णालयात उपलब्ध होते. त्यांनी तायडे यांना रुग्णालयात घेऊन ना जाता रिक्षातच तपासले. दरम्यान, डॉक्टरांनी अभिनव तायडे यांना मृत घोषित केले. त्यानंतर रुग्णालयाचे सोपस्कार पूर्ण करून अभिनव यांच्या नातेवाईकांना त्यांचे मृत प्रमाणपत्र दिले. दुःखी झालेल्या त्यांच्या मुलाने आणि नातेवाईकांनी अभिनव यांना घरी आणले. तथापी, अंत्यसंस्काराची तयारी सुरु करण्यात आली. मात्र हे सगळं घडत असताना अचानक त्यांच्या नातेवाईकांना अभिनव यांच्या हृदयाचे ठोके सुरू असल्याचे लक्षात आले. त्यामुळे नातेवाईकांनी अजून वेळ न घालवता त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. त्या रुग्णालयानेही त्वरित उपाचार सुरु केले. परिणामी, अभिनव तायडे हे शुद्धीवर आले.
मात्र, या प्रकरणामुळे शिवनेरी रुग्णालयामधील डॉ. अहुजा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, डॉ. अहुजा यांनी आपली चूक मान्य केली असून आजूबाजूच्या गोंगाटामुळे आणि रुग्णाची नस न मिळाल्यामुळे ही चूक झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या संदर्भात अभिनव तायडे यांना कावीळ झाल्याचे निष्पन्न झाले असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.
हेही वाचा