Chitra Wagh  Team Lokshahi
ताज्या बातम्या

शिंदे-फडणवीस सरकारमुळे राज्यात महिला भयमुक्त, चित्रा वाघ यांनी यादीच वाचून दाखवली...

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमुळे राज्यातील महिला भय आणि भीतीमुक्त झाल्या आहेत.

Published by : Pankaj Prabhakar Rane

नागपूर : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमुळे राज्यातील महिला भय आणि भीतीमुक्त झाल्या आहेत. कारण सरकार वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांवर कारवाई करताना दिसत आहे, अशा शब्दांत भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांना सरकारच्या कामाचं कौतुक केलं. त्या नागपूरमध्ये बोलत होत्या.

चित्रा वाघ म्हणाल्या, सरकार कुणाचंही असो महिला आणि मुलींच्या सुरक्षा ही प्राथमिकता असली पाहिजे. याबाबत शिंदे-फडणवीस सरकार आग्रही आहे. मी याधीही असं म्हटलं नव्हतं की, आमचं सरकार आलं की, विनयभंग, महिलांवरील अत्याचार बंद होतील. कारण ही समाजातील विकृती आहे. पण त्या-त्या वेळेला अशा घटनांवरती सरकार काय भूमिका काय घेते? हे पाहणं अतिशय गरजेचं असतं, असंही त्यांनी सांगितलं.

गेल्या अडीच वर्षांत तुम्ही किती अधिकाऱ्यांना बडतर्फ केलं? कितींवर कारवाई केली? हे सरकारने एकदा सांगावं, असा सवाल वाघ यांनी ठाकरे सरकारला केला. त्या म्हणाल्या गेल्या अडिच वर्षात अनेक मेल केले. कारण प्रत्यक्षात भेट होत नव्हतीच. दरम्यान फक्त तुमचं पत्र मिळालं हे, ऑटोमेटेड उत्तर मिळतं होतं. आजघडीला आमच्या सरकारमध्येही महिलांवर अत्याचार, बलात्कार होतात. मात्र त्या ठिकाणी शिंदे-फडणवीस सरकार कारवाई करताना दिसत आहे. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, येथे महिलांवर वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांची गय केली जाणार आहे, अशा पद्धतीचं सरकारचं काम असल्याचा त्यांनी सांगितलं.

चित्रा वाघ यांनी काही घटनांचा आवर्जून उल्लेख केला. नंदुरबारमध्ये एका महिलेवर सामुहिक अत्याचार झाला होता. ही घटना गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देताच एक आयओ आणि पीआयचं निलंबन करण्यात आलं. पुण्यात एका महिलेला हेड कॉन्स्टेबलने मारहाण केली होती. एफआयच्या ऐवजी एनसी करण्यात आली. याबाबत माहिती देताच हेड कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आलं.

भंडाऱ्याच्या घटनेत देखील दोन अधिकारी आणि एक महिला अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचं धाडसं शिंदे-फडणवीस सरकारने केल्याचं वाघ यांनी सांगितलं. मंत्रालयात एका महिलेचा अपमान करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सदर अधिकाऱ्याला कार्यमुक्त करण्यात आलं. वरील सर्व घटनांच्या माध्यमातून सरकारने इशाराच दिला आहे की, शिंदे-फडणवीस सरकारने या राज्यात महिला-मुलींकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही. गेली अडीच वर्ष ऑनलाईन सरकार होतं. कोणी-कोणाला भेट नव्हतं. आता मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री राज्यात फिरत आहे, लोकांना भेटत आहेत, तर त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे, असंही वाघ म्हणाल्या.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 IND vs PAK : टीम इंडियावर मॅच रेफरी घेणार अ‍ॅक्शन? पाकिस्तान खेळाडूंशी हस्तांदोलन न करण खेळाडूंवर भोवणार, काय सांगतो ICC-ACC नियम

Waqf Amendment Bill : वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकातील तरतुदी, न्यायालयाची तात्पुरती स्थगिती

आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तांदळाची पेज; जाणून घ्या फायदे

Sanjay Raut On IND-PAK Match : पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं' भारत-पाक सामन्यावर संजय राऊतांचा संताप