मुंबईतील बहुचर्चित मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी आता चौकशीचा फास आणखी घट्ट झाला आहे. मुंबईतील मिठी नदी गाळ गैरव्यवहारप्रकरणी ईडीकडून मुंबईत 15 जागी विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे. मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्याप्रकरणी ईडीने अभिनेता डिनो मोरिया, जय जोशी, केतन कदम यांच्या मुंबईतील घरावर छापे टाकले आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून ईडीकडून ही छापेमारी सुरू आहे. याप्रकरणी त्यांची याआधी मुंबई पोलिसांकडून चौकशीसुद्धा करण्यात आली होती. डिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सॅन्टिनो यांना काही कागदपत्रांसह उपस्थित राहण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेनं सांगितलं होतं. डिनो मोरिया हा शिवसेना (ठाकरे गट) युवानेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीय मानला जातो. त्यामुळे या प्रकरणात ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. वरळी, बांद्रा आणि कांदिवली या ठिकाणी ईडीची कारवाई सुरु आहे.
याप्रकरणी तीन पालिका अधिकारी, पाच कंत्राटदार, तीन मध्यस्थ आणि दोन कंपन्यांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गैरव्यवहारामुळे पालिकेला 65 कोटी 54 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा आरोप आहे. डिनो मोरिया आणि त्याच्या भावाची आर्थिक गुन्हे शाखेनं जवळपास आठ तास चौकशी केली होती. याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी केतन कदम आणि डिनो मोरिया यांच्यात 2019 आणि 2022 या कालावधीत अनेक आर्थिक व्यवहार झाले आहेत त्याची चौकशी सुरु आहे. आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणा सक्तवसुली संचालनालयने (ED) मुंबईतील सुमारे 15 ठिकाणी एकाचवेळी छापेमारीची कारवाई केली आहे.
मुंबईतील मिठी नदीचे गाळ काढण्याच्या (डेसिल्टिंग) कामामध्ये झालेल्या घोटाळ्याच्या आरोपांवर आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) चौकशी सुरू होतीच, पण आता त्यामध्ये ईडीची एन्ट्री झाली आहे. या प्रकरणात तब्बल 65 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगचे आरोप करण्यात आले आहेत. 2022 ते 2023 या काळात हा घोटाळा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी मुंबई महापालिकेकडून मोठ्या प्रमाणावर गाळ पुशर आणि ड्रेजिंग मशीन खरेदी करण्यात आल्या होत्या. ही खरेदी कोचीस्थित मॅटप्रॉप टेक्निकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून करण्यात आली. मात्र, या व्यवहारात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे.
याप्रकरणी केतन कदम आणि सह-आरोपी जय जोशी यांच्यावर कोची येथील मॅटप्रॉप टेक्निकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडकडून खरेदी केलेल्या यंत्रसामग्रीसाठी महापालिकेकडून जास्त दर आकारल्याचा आरोप आहे. त्या प्रकरणात केतन कदम आणि जय जोशी यांना अटक करण्यात आली होती. मात्र व्हर्गो स्पेशालिटीजचे मालक जय जोशी या आरोपीला सत्र न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला. गेल्या महिन्यात या प्रकरणात सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या जय जोशी यांना न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOW) कार्यालयात जाऊन तपासात सहकार्य करण्याच्या अटींसह जामीन मंजूर केला. तथापि केतन कदम यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.
आर्थिक गुन्हे शाखेने या संदर्भात पाच कंत्राटदार, मुंबई महानगरपालिका (BMC) तीन अधिकारी, तीन मध्यस्थ आणि दोन खासगी कंपनी अधिकाऱ्यांविरुद्ध फसवणूक, गुन्हेगारी विश्वासघात, बनावटगिरी आणि इतर कलमांखाली एफआयआर दाखल केला होता. पोलिसांनी दावा केला होता की, त्यांनी 2021-22 आणि 2022-23 दरम्यान मिठी नदीतील गाळ काढण्याच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता करून महानगरपालिकेची फसवणूक करण्याचा कट रचला होता. विशेष म्हणजे महापालिकेचे काही अधिकारीसुद्धा यात आरोपी आहेत.
गंगापूर तहसीलदार नवनाथ वाधवाड आणि उपविभागीय अधिकारी अरुण जन्हाड यांच्या मूक संमतीने हा सगळा प्रकार झाल्याचा संशय आहे. याप्रकरणी दोघांची विभागीय चौकशी होणार आहे. पर्यावरण कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन आदी कायदेशीर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
हा मुद्दा केवळ महसूल बुडाल्याचा नाही, तर पर्यावरणाचीही गंभीर हानी झाली आहे. नदीपात्रातील वाळू उपसा मर्यादेबाहेर गेल्याने पर्यावरण संतुलन बिघडू शकते. जिल्हाधिकारी स्वामी यांच्या पुढील कारवाईनंतर शासनाकडून कडक पावले उचलली जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर जिल्हा प्रशासनाकडून सखोल चौकशी सुरू असून, दोषींवर कठोरात कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. सर्व संबंधितांची जबाबदारी निश्चित करून शासनाचा बुडालेला 27 कोटींचा महसूल वसूल करण्यासाठी पुढील पावले उचलली जातील.
हेही वाचा