महागाई (Inflation) नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. अशातच सरकारकडून तेल कंपन्यांना तेलाच्या किंमतीमध्ये 10 (Oil prices) रुपयापर्यंत दर कमी करण्याच्या सूचना मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान खाद्यतेलांचे परीक्षण करण्यासाठी गुरुवारी खाद्य तेल कंपन्याबरोबर खाद्य विभागाच्या सचिवानी तेल कंपन्यांबरोबर बैठक बोलवण्यात आली आहे. त्या बैठकीत सरकारकडून तेल कंपन्याना 10 रुपयांपर्यंत किंमत कमी करण्याच्या सूचना देऊ शकतात असंही यावेळी सांगण्यात आले आहे.
सरकारच्या आदेश कंपन्यांनी पाळले
तेलकंपन्याना खाद्यतेलाच्या किंमती कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सरकारने सूचनी दिल्यानंतर 200 रुपयांनी विक्री होणारे खाद्य तेलाची किंमत त्यानंतर 160-170 इतकी झाली होती.
तेल कंपन्यांकडून 20 ते 25 रुपयांची घट
मागील महिन्यात तेल कंपन्यांकडून 20 ते 25 रुपयांची घट करण्यात आली होती. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही खाद्यतेलांच्या किंमती कमी झाल्याचे सांगण्यात आले आहे, त्याचाच फायदा छोट्या मोठ्या बाजारावरही होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 50 टक्क्यापर्यंत खाद्य तेलाच्या किंमती उतरल्या असल्याचे सांगण्यात आले आहे.