ताज्या बातम्या

ईद-ए-मिलाद आणि अनंत चतुर्दशी एकाच दिवशी ; मुंबईतील मुस्लिम समुदायाचा 'मोठा' निर्णय

Published by : Team Lokshahi

मुंबईत गणपती विसर्जनासाठी मोठ्या संख्येने भाविक रस्त्यावर येतात. या दिवशी मोठ्या उत्साहात मिरवणूका काढण्यात येतात. दरम्यान 28 सप्टेंबर रोजी एकाच दिवशी अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद येत आहे. यामुळे यंदाच्या ईद-ए-मिलादच्या मिरवणूका या अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी निघणार आहेत. मुस्लिम समुदायाकडून याबद्दलचा निर्णय घेण्यात आला आहे.

गणेशोत्सव हा सण मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर मुंबई नगरी गजबजून गेलेली असते. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी विसर्जनाला मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचं पाहायला मिळतं. त्याचबरोबर ईद-ए-मिलाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात मुस्लिम भाविक सुद्धा रस्त्यावर उतरून मिरवणुका काढतात. त्यामुळे यावेळी देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याच चित्र असतं. हाच मुद्दा या बैठकीमध्ये मांडण्यात आला. पण यावर उपाय म्हणून काहीतरी मार्ग काढणं हे जास्त गरजेचं होतं. त्यामुळे ईदचा जुलूस हा अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी काढण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला 90 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी समंती दिली. त्यामुळे पोलिसांना विश्वासात घेऊन ईदची मिरवणूक एक दिवस पुढे ढकलण्यात आली.

मुस्लिम बांधवांकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाचं पोलिसांनी देखील कौतुक केलं आहे. मुंबई पोलिसांना या दोन्ही दिवशी पोलीस बंदोबस्त तैनात करायचा आहे. शिवाय शहराच्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या मुंबई पोलिसांवरचा ताणही यामुळे थोडा कमी झालाय. तर मुस्लिम बांधवांनी घेतलेल्या या निर्णयाचं देखील कौतुक केलं जात असल्याचं सांगण्यात येत आहे.

याआधी नाशिक, धाराशिव, मालेगाव यांसारख्या शहरांमध्ये मुस्लिम बांधवांकडून हा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे यंदा हे दोन्ही सण अगदी उत्साहात पार पडणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र; म्हणाले...

शिरूर मतदारसंघाच्या ईव्हीएम स्ट्राँगरुममधील सीसीटीव्ही 24 तास बंद

Shambhuraj Desai : 4 तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा चांगल्या मताधिक्याने माननीय नरेश म्हस्के साहेब निवडून येतील

"पहिल्या चार टप्प्यातच आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा सुफडा साफ केला "; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा दावा

मोठी बातमी! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक