राज्यात आजपासून ‘एक राज्य, एक नोंदणी’ योजनेला सुरवात झाली आहे. जमिनी आणि मालमत्तांच्या दस्तांची नोंदणी त्या त्या जिल्ह्याच्या सहनिबंधक कार्यालयातच जाऊन करावी लागते. एका व्यक्तीने जर इतर जिल्ह्यात मालमत्ता खरेदी केली, तर त्या व्यक्तीला त्या जिल्ह्यात जाऊनच दस्त नोंदणी करावी लागते. मात्र याला प्रक्रियेला खूप वेळ जातो आणि यामुळे मोठी गैरसोय देखील होते.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "एक राज्य, एक नोंदणी" ही योजना जाहीर केली असून यामुळे आता कुठेही राज्यात दस्त नोंदणी करता येणार आहे. कोणत्याही संबंधित कार्यालयातून दस्तनोंदणी करणे शक्य होणार असून खरेदीदारांना दस्त नोंदणीसाठी विशिष्ट कार्यालयात जाण्याची गरज पडणार नसल्याची माहिती मिळत आहे.
सध्या या योजनेची अंमलबजावणी प्रायोगिक तत्त्वावर मुंबई शहर आणि उपनगरात सुरू करण्यात येत असून जर ही योजना यशस्वी झाली तर त्यानंतर राज्यात ती लागू करण्यात येईल.