ताज्या बातम्या

राजकीय घडामोडींना वेग; शिंदे-फडणवीस दिल्लीत; अजितदादा नाराज ?

Published by : shweta walge

राज्याच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला पोहोचले आहेत. या भेटीत महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर त्यांच्या गटाच्या मंत्र्यांनी महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

राज्य मंत्रिमंडळाची मुंबईत आज महत्वाची बैठक पार पडली. मात्र, या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर होते. तर याबाबत प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार हे आजारी असल्यामुळे ते बैठकीला उपस्थित राहू शकले नसल्याचं सांगण्यात आलं, मात्र अजित पवारांनी तातडीने देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसह आमदारांची बैठक बोलावली. त्यामुळे अजितदादा नेमकी नाराज आहेत की, आजारी आहेत ? याबाबत आता सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा मुंबईत आले होते. त्या दौऱ्यात शिंदे, फडणवीस सोबत होते. पण अजित पवार नव्हते. फडणवीसांच्या घरी गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी अजित पवार आले. पण शिंदेंच्या घरी आले नाहीत.

कॅबिनेटच्या बैठकीलाही अजित पवार आले नाहीत, आजारपणाचं कारण देण्यात आलंय. शिंदे, फडणवीस दिल्ली दौऱ्याला गेलेत पण त्यांच्यासोबत अजित पवार गेले नाहीत. 7 तारखेच्या दिल्लीतल्या जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीलाही अजित पवार जाणार नाही आहेत, नियोजित कार्यक्रमांचं कारण देण्यात आलंय.

Pune Rain : पुणे शहरात मुसळधार पावसाला सुरुवात, ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू

Virgin Mojito Recipe: उन्हाळ्यात थंडावा मिळण्यासाठी बनवा थंडगार वर्जिन मोजितो

"सुजय विखे पाटील यांना लोकसभेत पाठवल्याशिवाय पर्याय नाही"; उपमुख्यमंत्री अजित पवार असं का म्हणाले?

अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची संयुक्त निर्मिती रुपेरी पडद्यावर अवतरणार ‘फुलवंती’

‘अल्याड पल्याड’ चित्रपटात अभिनेता मकरंद देशपांडे दिसणार वेगळ्या भूमिकेत