महाराष्ट्राच्या सांस्कृतिक रंगभूमीवर आपल्या अभिनयाची छाप पडणारे, अष्टपैलू अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक सुबोध भावे यांनी आपल्या चाहत्यांना आनंदी बातमी दिली आहे. ते लवकरच बॉलिवूडमध्ये पदापर्ण करणार आहेत. तसेच ते बॉलिवूडमध्ये ते थेट मुख्य भूमिकेत दिसणार असल्याने खरचं चाहत्यांना गुडन्यूज आहे.
सुबोध भावे हे या चित्रपटामध्ये 17व्या शतकातील थोर संत-कवी संत तुकाराम महाराजांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यामध्ये तुकारामांचे जीवन, भक्ती, अभंग आणि सामाजिक विचार पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे नाव 'संत तुकाराम' असून येत्या 18 जुलैला जगभरात प्रदर्शित होणार आहे.
सुबोध भावे यांनी याआधी लोकमान्य टिळक, बालगंधर्व अशा ऐतिहासिक आणि समाजाला संदेश देणाऱ्या भूमिका साकारल्या आहेत. आताही ते संत तुकाराम महाराज्यांची भूमिका साकरणार आहेत.