Dadaji Bhuse Team Lokshahi
ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना बियाणं, रसायणांचा तुटवडा पडू देणार नाही; कृषीमंत्री भुसे यांचं आश्वासन

Published by : Sudhir Kakde

पालघर | नमीत पाटील : आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची तयारी सुरु आहे. त्यामुळे कृषी विभागानं देखील तयारीला सुरुवात केली आहे. राज्यात कोणत्याही जिल्ह्यात शेतकऱ्यांना बियाणांचा आणि रासायनिक पुरवठा कमी पडणार नाही असं आश्वासन आज राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे (Dadaji Bhuse) यांनी दिलं आहे.

पालघरचे (Palghar) पालकमंत्री असलेल्या दादाजी भुसे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना आज आगामी काळातील खरीप हंगामासाठी हे आश्वासन दिलं आहे. या संदर्भात केंद्रीय कृषी मंत्री तसंच राज्यमंत्र्यांची भेट घेऊन राज्याला मागणी प्रमाणे रासायनिक खतं आणि बियाणांचा पुरवठा करावा अशी मागणी केल्याचं भुसे यावेळी भुसे यावेळी म्हणाले.

महाराष्ट्र राज्याच्या 45 लाख मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी असून, तेवढा पुरवठा करावा अशी मागणी आपण केंद्राकडे केल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली असून पीक विम्या संदर्भात राज्यात बिड पॅटर्न राबवला जाणार असल्याच यावेळी कृषी दादाजी भुसे यांनी सांगितलं. पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले त्याप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Shanghai Cooperation Organization Meeting : मोदी, पुतिन, जिनपिंग, शरीफ 'या' दिवशी येणार एकाच मंचावर

Latest Marathi News Update live : अमित ठाकरे आशिष शेलार यांच्या भेटीला

Ajit Pawar : चाकरमानी नव्हे; 'कोकणवासी' म्हणा! उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले प्रशासनाला आदेश

Nagpur Marbat : नागपूरसाठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली काळी आणि पिवळी मारबत मिरवणूक आज निघणार