ताज्या बातम्या

Home Remedies : स्वयंपाकात चटका लागल्यास घरीच करा हे सोपे उपचार

स्वयंपाकात चटका लागल्यास: थंड पाणी, कोरफड आणि तूप-मधाचे घरगुती उपाय करून जळजळ कमी करा.

Published by : Team Lokshahi

डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे

घर म्हटलं की त्यात छोटे मोठे अपघात होतच राहतात. कधीतरी घाईघाईने भाजी कापताना सुरी लागते, कधीतरी दरवाजा बंद करताना बोट चिमटलं जाऊ शकते, तर कधी इस्त्री करताना किंवा स्वयंपाक करताना चटका लागू शकतो. घरी इजा बघून त्यावर उपचार केले जातात. जास्तप्रमाणात रक्तस्त्राव होत असेल तर दवाखान्यात जावे लागते. परंतू दवाखान्यात जाण्यापूर्वी हे तीन उपाय नक्की केले पाहिजेत.

स्वयंपाक करताना चटका लागल्यास सर्वप्रथम त्याठिकाणी थंड पाणी लावावे किंवा नळाच्या बारीक धार भाजलेल्या ठिकाणी सोडावी. मात्र ही धार हळूवार आहे का? याकडे लक्ष ठेवावं. त्यानंतर त्याजागेवर कोरफडीचा ताजा गर ठेवावा. यासाठी कोरफडीचा पात घ्यावी. कोरफडणीची हिरवी साल सुरीच्या मदतीने वेगळी करावी. त्यामधील मांसला गराचा भाग वेगळा करुन तो भाजलेल्या ठिकाणी अलगद ठेवावा. यामुळे एकतर त्याठिकाणी होत असलेली जळजळ लगेच कमी होते. दुसरं म्हणजे जितक्या पटकन गर लावावा, तितकी भाजलेल्या ठिकाणी फोड येण्याची शक्यता कमी होते.

कोरफडीमुळे आग बऱ्यापैंकी कमी झाली की तिसरा उपाय म्हणजे भाजलेल्या ठिकाणी तूप आणि मधाचं एकत्र केलेलं मिश्रण लावून ठेवणे. तूप आणि मध घराघरात असतेच. त्यामुळे स्वच्छ वाटीमध्ये एक चमचा तूप आणि एक चमचा मध एकत्र मिक्स करावे आणि हळुवार हातांनी भाजलेल्या ठिकाणी लावा. बऱ्याचदा भाजलेली त्वचा इतकी संवेदनशील झालेली असते की त्या ठिकाणी कसलाही स्पर्श नकोसा वाटतो. अशा वेळेला आयुर्वेदात मोरपीसाच्या सहाय्याने तूप मधाचे मिश्रण लावायला सांगितलेलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा