ताज्या बातम्या

Thane : कळवा रुग्णालयात एका दिवसांत पाच रुग्णाचा मृत्यू

कळवा रुग्णालयात एका दिवसांत पाच रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

कळवा रुग्णालयात एका दिवसांत पाच रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कळवा रुग्णालयाला भेट दिली.अतिदक्षता विभागात रुग्णाचा मृत्यू होऊन सहा तास उलटून देखील, तो मृतदेह तशाच अवस्थेत पडून असल्याचे दिसून आले. यामध्ये एका गरोदर महिलेचा समावेश आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

रुग्णालयातील भीषण वास्तव बघून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रशासनाची चांगलीच कानउघाडणी केली. वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर आक्रोश केला आहे. रुग्णालयाला मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे.

रुग्ण दगावला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्यानंतर कळवा रुग्णालय प्रशासनकडून देखील खुलासा करण्यात आला आहे. आयसीयू देखील फुल असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे सांगितले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्री फडणवीस माढ्यात दाखल; नुकसानीची पाहणी करणार

kolkata Heavy Rainfall : कोलकात्यात पावसाचा कहर; 10 जणांचा मृत्यू

Dickie Bird : प्रसिद्ध अंपायर डिकी बर्ड यांचे निधन

Maharashtra Weather Update : 'या' तारखेपासून राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार