बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सहा महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. शेख हसीना आणि स्थानिक नेते शकील बुलबुल यांच्यात फोनवरून जे संभाषण झाले त्याची चौकशी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने यासंदर्भात शेख हसीना यांना सहा महिन्याची शिक्षा सुनावली आहे.
गोविंदगजचे रहिवाशी आणि स्थानिक नेते शकील बुलबुल आणि माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यात फोनवरून झालेल्या संभाषणाचे ऑडिओ क्लिप लीक झाले होते. त्यात त्यांनी "माझ्याविरोधात 227 खटले चालू असून 227 जणांना ठार मारण्याचा परवाना मिळाला आहे." अश्या आशयाचे वक्तव्य होते. यावर सरकारी वकिलांनी हे वक्तव्य न्यायालयाचा अवमान करणारे आहे
अश्या वक्तव्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया धोक्यात येऊ शकते. बांगलादेशात झालेल्या मोठ्या उठावानंतर शेख हसीना गेल्या वर्षी 5 ऑगस्ट रोजी बांग्लादेश सोडून भारतात पळून गेल्या होत्या. या संभाषणातील स्थानिक नेते शकील बुलबुल यांना सुद्धा २ महिन्यांची शिक्षा झाली आहे. त्या संभाषणात दिलेल्या धमक्या पीडितांना आणि न्याय मागणाऱ्या साक्षीदारांना धमकावण्याच्या उद्देशाने होत्या. यासंदर्भात शकील बुलबुल आणि शेख हसीना यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते मात्र ते राहिले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या अनुपस्थितीत शिक्षा सुनावली.
बांगलादेशमध्ये स्थापन झालेल्या युनूस सरकारने हसीना यांच्याविरुद्ध 225 हून अधिक गुन्हे दाखल केले आहेत, ज्यात खून, अपहरण ते देशद्रोह असे अनेक गुन्हे आहेत.