ताज्या बातम्या

Foxconn In Tamil Nadu : तामिळनाडूमध्ये आयफोन बनवणाऱ्या Foxconn चा नवा सेटअप प्लांट

ॲपल या कंपनीकरता आयफोन बनवणारी एक प्रमुख कंपनी फॉक्सकॉन लवकरच तमिळनाडूमध्ये नवीन प्लांट सेटअप करण्यासाठी योजना करत आहे.

Published by : Team Lokshahi

ॲपल या कंपनीकरता आयफोन बनवणारी एक प्रमुख कंपनी फॉक्सकॉन लवकरच तमिळनाडूमध्ये नवीन प्लांट सेटअप करण्यासाठी योजना करत आहे. हा प्लांट आयफोनसाठी एन्क्लोजर (कव्हर्स) बनवण्यासाठी असेल. यामुळे भारतात आयफोनचे उत्पादन वाढेल आणि चीनवरील अवलंबित्व कमी होईल. तमिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतील. हा आयफोनचा व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने घेतलेला महत्वपूर्ण निर्णय मानला जात आहे.

फॉक्सकॉनने भारतात आपले उत्पादन कार्य अधिक व्यापकपणे वाढवण्याचा विचार केला आहे. त्यामुळे नवीन प्लांट सेटअप उभारण्याचा विचार केला गेला आहे. या प्लांटमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. नवीन तंत्रज्ञान आणि उत्पादन प्रक्रिया भारतात येतील. या प्लांटमुळे फॉक्सकॉनला भारतात आपले उत्पादन आणि व्यवसाय वाढवण्यासाठी मदत होईल. तसेच ॲपलला देखील चीन बाहेरील एक मजबूत पुरवठादार मिळेल. आता नुकत्याच झालेल्या अहवालात असे दिसून आले आहे की, फॉक्सकॉन आयफोन मॅन्युफॅक्चरिंगसाठी तामिळनाडूमधील नवीन युनिट सेटअप करण्याची तयारी करत आहे. यामुळे निश्चितच आयफोनचे भारतातील उत्पादन वाढण्यास मोठी मदत होणार आहे. डिस्प्ले मॉड्युल, असेंब्ली आणि एअरपॉड्स उत्पादनासह, भारतात आयफोनचे उत्पादन वाढविणे हे फॉक्सकॉनचे महत्वाचे उद्दीष्ट आहे. फॉक्सकॉन मॅन्युफॅक्चरिंगसाठी तामिळनाडूमधील ईएसआर इंडस्ट्रियल पार्क येथे नवीन युनिट स्थापन करण्याचा विचार करीत आहेत. या नव्या प्लांट सेटअपमध्ये आयफोन बरोबरच इतर गोष्टींचेही प्रोडक्शन केले जाणार आहे.

फॉक्सकॉनच्या भारतातील प्रवेशामुळे हे निश्चित झाले आहे की, भारत आपल्या सप्लायर्समध्ये विविधता आणू इच्छित आहे. यापूर्वी केवळ टाटा इलेक्ट्रॉनिक्स स्थानिक पातळीवर असे मॅन्युफॅक्चरिंग करत होते. मात्र या शर्यतीमध्ये फॉक्सकॉनने सुद्धा उडी मारली आहे. मात्र असे असले तरीही फॉक्सकॉन या कंपनीने अधिकृतरित्या याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.

हेही वाचा

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा