Ganesh Naik Team Lokshahi
ताज्या बातम्या

Ganesh Naik यांना अटक होणार? मुंबई पोलिसांचं पथक रवाना

लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेने त्यांच्यावर गंभीर आरोप; घरी आणि फार्म हाऊसवर शोध सुरु.

Published by : Sudhir Kakde

मुंबई : भाजप नेते गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यावर बलात्कार आणि धमकावण्यासारखे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. लिव्ह ईन मध्ये राहणाऱ्या दिपा चौहान (Deepa Chauhan) या महिलेने त्यांच्यावर हे आरोप केले आहेत. गणेश नाईक यांच्यावर या प्रकरणात दोन गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यानंतर आता मुंबई पोलिसांचं (Mumbai Police) पथक गणेश नाईक यांच्या शोधात रवाना झालेलं आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणात कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले आहेत. महिलेने केलेल्या तक्रारदाखल पत्रानुसार, गणेश नाईक हे सदर महिलेसोबत 27 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असल्याचे खळबळजनक आरोप या महिलेने केले आहे. तसेच गणेश नाईक यांच्यापासून त्यांना एक मुलगाही आहे.

दरम्यान, सध्या मुलाच्या शिक्षणाच्या व भविष्यासाठी तरतूद म्हणून उपाययोजना करा असा तगादा लावल्याने गणेश नाईक यांनी जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचाही आरोप संबंधित महिलेने केला आहे. संबंधित पत्र महिलेने राज्य महिला आयोगाला पाठवले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : त्रिभाषा सूत्र विरोधात शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती आक्रमक

Baby Trafficking Pune : पुण्यात गुन्हेगारीचा सापळा; 40 दिवसांच्या बालकाची विक्री, 6 आरोपी अटकेत

Dhurandhar Movie Teaser Out : रणवीर सिंगचा रावडी लूक; 'धुरंधर'च्या टीझरनं वाढवली चाहत्यांची उत्सुकता

CM Devendra Fadnavis Podcast : पंढरपूरातून मुख्यमंत्र्यांच पहिलं पॉडकास्ट, म्हणाले, "वारी ना इस्लामी राजवटीत थांबली, ना..."