Agnipath Scheme | Agnipath | Agniveer Recruitment team lokshahi
ताज्या बातम्या

Agniveer Recruitment : भारतीय लष्कराने अग्निवीर भरती प्रक्रिया केली पूर्ण, असा करावा लागेल अर्ज

असा करावा लागेल अर्ज

Published by : Shubham Tate

Agniveer Recruitment : देशाच्या संरक्षणासाठी समर्पित होण्याची इच्छा बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय सैन्याने अग्निपथ (Agneepath) योजनेअंतर्गत अग्निवीर भरती रॅलीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेत भरतीसाठी आवश्यक असलेली सर्व माहिती देण्यात आली आहे. भरतीमध्ये (recruitment) सामील होण्यासाठी, सर्व उमेदवारांना ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार भारतीय लष्कर JOININDIANARMY.NIC.IN च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतील. (government jobs indian army agniveer requirement notification out- now eligibility process application date here)

जुलैपासून नोंदणी सुरू होईल :

अग्निवीर भरती रॅलीसाठी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया जुलै 2022 पासून सुरू होणार असल्याची माहिती भारतीय लष्कराने जारी केलेल्या अधिसूचनेत दिली आहे. ही भरती खालील पदांसाठी होणार आहे-

अग्निवीर जनरल ड्युटी

अग्निवीर तांत्रिक

अग्निवीर तांत्रिक (एव्हिएशन/म्युनिशन टेस्टर)

अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल

अग्निवीर ट्रेड्समन 10वी पास

पगार किती असेल-:

भारतीय लष्कराने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, अग्निवीर पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना पहिल्या वर्षी 30,000 रुपये, दुसऱ्या वर्षी 33,000, तिसऱ्या वर्षी 36,500 आणि चौथ्या वर्षी 40,000 रुपये वेतन आणि भत्ते दिले जातील. सोबतच निवृत्तीच्या वेळी सेवा निधीही दिला जाणार आहे.

नियम आणि अटी :

अग्निवीरांची 4 वर्षांच्या सेवा कालावधीसाठी आर्मी ऍक्ट 1950 अंतर्गत नोंदणी केली जाईल.

अर्जदारांची वयोमर्यादा 17.5 ते 23 वर्षे दरम्यान असावी.

नामांकित अग्निवीर कोणत्याही पेन्शन किंवा ग्रॅच्युइटीसाठी पात्र असणार नाही.

आवश्यक पात्रता काय आहेत :

जनरल ड्युटीसाठी, उमेदवारांना एकूण ४५% गुणांसह १०वी पास असणे आवश्यक आहे.

अग्निवीर टेक्निकल (एव्हिएशन/म्युनिशन टेस्टर) साठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि इंग्रजी विषयात ५०% गुणांसह १२वी उत्तीर्ण.

लिपिक/स्टोअरकीपर पदांसाठी 60% गुणांसह 12वी पास. इंग्रजी आणि गणितात ५०% गुण आवश्यक.

ट्रेड्समनसाठी 10वी आणि 8वी उत्तीर्ण उमेदवारांची स्वतंत्र भरती असेल. अर्जदाराला सर्व विषयात 33% गुण असावेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस