गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) एक्यूआयएस (भारतीय उपखंडातील अल-कायदा) शी संबंधित चार कथित दहशतवाद्यांना अटक केली आहे, अशी माहिती वृत्तसंस्था एएनआयने दिली आहे. वृत्तानुसार, अहमदाबादमधून 2, दिल्लीतून एक आणि नोएडामधून एक दहशतवाद्यांना आज, 23 जुलै रोजी अटक करण्यात आली. या कारवाईची माहिती पत्रकार परिषदेत दिली जाईल, असे एटीएसचे डीआयजी सुनील जोशी यांनी सांगितले.
त्या चार दहशतवाद्यांची नावे अशी -
1. मोहम्मद फैक
२. मोहम्मद फरदीन
3. सेफुल्ला कुरेशी
4. झिशान अली
हेही वाचा