Ichalkaranji Municipal Corporation Team Lokshahi
ताज्या बातम्या

कोल्हापुरात आणखी एक 'मनपा'; इचलकरंजीकरांची मागणी झाली पुर्ण

Ichalkaranji Municipal Corporation ही राज्यातील 28 वी महानगरपालिका झाली आहे.

Published by : Sudhir Kakde

कोल्हापूर : इचलकरंजी ही राज्यातील 28 वी महानगरपालिका झाली आहे. राज्यात आता आणखी एका महानगरपालिकेचा समावेश झाला आहे. तर कोल्हापुर जिल्ह्यातही दुसऱ्या महानगरपालिकेचा समावेश झाला आहे. कारण आता इचलकरंजी नगरपरिषदेला महानगरपालिकेचा दर्जा मिळणार आहे. तशी उद्घोषणा देखील करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Ichalkaranji Municipal Corporation)

इचलकरंजीचा महानगरपालिका होण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. राज्य शासनाने याबद्दलची प्राथमिक ऊद्घोषणा देखील केली आहे. त्यामुळे आता इचलकरंजी राज्यातील 28 वी महानगरपालिका होणार असून, त्याचा फायदा इचलकरंजीकरांना होणार आहे. महानगरपालिका झाल्यामुळे जादाचा नीधी इचलकरंजीच्या वाट्याला येणार आहे.

इचलकरंजीचे शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी याबद्दलची घोषणा केली आहे. मंत्रालयात वरिष्ठ नेत्यांच्या त्यांनी भेटीगाठी घेतल्या. मविआ सरकारच्या तसेच ही मागणी करणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांचे धैर्यशील माने यांनी आभार मानत अभिनंदन केलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा