ताज्या बातम्या

“इलाका तुम्हारा और धमाका हमारा” सुषमा अंधारे यांचा मनसेच्या इशाऱ्यावर प्रत्युत्तर

Published by : shweta walge

शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुंलडच्या सभेत मनसे प्रमुख राज ठाकरेंवर निशाणा साधला. त्यानंतर मनसेच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षांनी अंधारेंच्या सभेत राडा करण्याची धमकी दिली होती. यावरचा आता सुषमा अंधारे यांनी एक स्टाईल हैं, इलाका तुम्हारा और धमाका हमारा, असं म्हणत मनसे पक्षाच्या राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

सुषमा अंधारे काय म्हणाल्या,

मनसेच्या टीकेवर मी केवळ हसू शकते. ‘अपना एक स्टाईल हैं, इलाका तुम्हारा और धमाका हमारा’. मी पाठीमागे अजिबात बोलत नाही. मी जे बोलते ते अत्यंत वस्तुस्थिती आणि सत्य ते बोलत आहे. आजारपणाची टिंगल करणं हे कुठल्याही सुसंस्कृत, सभ्य, संवेदनशील माणसाला रुचणारं नाही, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

 पुढे म्हणाल्या की, असं असलं तरी मी मुलुंडच्या सभेत मांडलेले मुद्दे गैरलागू आहेत असं कोणाला वाटत असेल, तर माझी चर्चा करण्याची तयारी आहे. त्यांनी खुल्या सभेत चर्चेला उभं राहावं आणि ते जे बोलले ते मांडणं किती महाराष्ट्राच्या हिताचं होतं हे सांगावं. माझी त्यावर बोलण्याची तयारी आहे. ते मला त्यांचा मुद्दा पटवून देऊ शकले तर मी त्यांच्या शिष्यत्वाचा गंडा बांधायला तयार आहे.

असं असलं तरी ते मुद्द्यांची भाषा गुद्द्यांवर नेणार असतील तर शिवसेनेला गुद्द्यांची भाषा कुणीही शिकवण्याची गरज नाही. राडा संस्कृतीचा एनसायक्लोपिडिया शिवसेनेने लिहिला आहे, असं सुद्धा सुषमा अंधारे म्हणाल्या.

Daily Horoscope 29 April 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचा शुभ काळ होणार सुरु; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 29 एप्रिल 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

फडणवीसांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना धाराशिवमध्ये धरलं धारेवर; म्हणाले, "मोदींच्या ट्रेनमध्येच..."

T20 World Cup Selection : धावांचा पाऊस पाडणाऱ्या के एल राहुलचा पत्ता कट? भारतीय संघात 'या' दिग्गज खेळाडूंची केली निवड

"...म्हणून नरेंद्र मोदींच्या अंगात औरंगजेब संचारलाय"; संजय राऊतांनी सासवडमध्ये महायुतीवर डागली तोफ