Team Lokshahi
ताज्या बातम्या

लम्पीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर प्रशासन खबरदार, 5 गावे बाधित क्षेत्र म्हणून घोषित

5 किलोमीटर परिसरातील 44 गावे सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित

Published by : shweta walge

अनिल ठाकरे,चंद्रपूर :- महाराष्ट्रात सद्यस्थितीत गोवंशीय जनावरांवर लम्पी स्कीन डिसीजचा प्रादुर्भाव निदर्शनास आलेला आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील पशुधनामध्ये लम्पी स्कीन डिसीज लागन झाल्याचे रोग लक्षणावरून निदर्शनास आले आहे.

लम्पी स्कीन डिसीजमुळे जिल्ह्यातील मौजा चंद्रपूर, वरोरा तालुक्यातील एकार्जुना, सावली तालुक्यातील निफंद्रा, भद्रावती तालुक्यातील घोडपेठ व मोहबाळा ही पाच गावे बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. मौजा चंद्रपूर हे गाव बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याने रोग प्रादुर्भावाच्या ठिकाणापासून पाच किलोमीटर त्रिज्येचा परिसर सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या सतर्कता क्षेत्रात मौजा चंद्रपुर येथील दाताळा, कोसरला, नेरी व चोराळा तर भद्रावती तालुक्यातील मुरसा ही गावे समाविष्ट आहे.

मौजा एकार्जुना परिसरातील पाच किमी सतर्कता क्षेत्रात बोर्डा, वरोरा, जामगाव (खु.), जामगाव (बु.), सुर्ला, परसोडा, खैरगाव, शेंबळ, वनोजा, आनंदवन ही गावे समाविष्ट आहे. मौजा निफंद्रा परिसरातील सतर्कता क्षेत्र म्हणून अंतरगाव, अंतरगाव टोला, निमगाव, चिखली, बारसागड, गायडोंगरी, मेहा बुज, गेवरा खुर्द, गेवरा बुज, कसरगांव, चकवीलखल टोला, डोंगरगाव मस्के ही गावे समाविष्ट आहे. मौजा घोडपेठ परिसरातील सतर्कता क्षेत्र म्हणून नुन्हारा चालबर्डी, गुंजाळा, घोटनिंबाळा, कुडराळा, गोरजा, चपराळा, सायवन, लोणारा रीट (गोंडलोणारा), कचराळा हे गावे समाविष्ट आहे. मौजा भद्रावती व मौजा मोहबाळा परिसरातील रोग प्रादुर्भावाच्या ठिकाणापासून पाच किलोमीटर त्रिज्येचा परिसर सतर्कता क्षेत्र म्हणून कुनाडा, मानोरा, कुरोडा, पिपरबोडी, कढोली, बराज मोकासा व चिरादेवी ही गावे समाविष्ट आहे.

या परिसरातील गावांमध्ये बाधित जनावरे वगळता इतर गोवर्गीय जनावरांना प्रतिबंधक लसीकरण करावे. चंद्रपूर जिल्ह्यातील जनावरांचे बाजार, यात्रा, पशुप्रदर्शने आदी पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आले आहे. साथीच्या काळात बाधित भागातील जनावरांचा निरोगी भागात प्रवेश प्रतिबंधित करण्यात येत आहे. तसेच बाधित गावामध्ये बाधित जनावरांचे विलगीकरण करून त्यांच्या पिण्याच्या पाण्याकरीता व खाण्याकरिता पशुपालकांनी स्वतंत्र व्यवस्था करावी. रोग प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रामध्ये व रोग प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रामधून पशुधनाची ऑनलाइन पद्धतीने होणारी खरेदी-विक्री व प्रत्यक्ष वाहतूक प्रतिबंधित करण्यात येत आहे. गाई व म्हशींना स्वतंत्र ठेवणे, बाधित व अबाधित जनावरे वेगळी बांधणे तसेच या रोगाने ग्रस्त पशुधनाचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने पशुपालकांनी विल्हेवाट लावावी.

बाधित परिसरात संबंधित ग्रामपंचायतींनी स्वच्छता व निर्जंतुक द्रावणाची फवारणी करून निर्जंतुकीकरण करावे व रोगप्रसारास कारणीभूत असलेल्या डास, माशा, गोचीड आदींच्या नियंत्रणासाठी औषधांची फवारणी करावी. लम्पी स्कीन रोगाचा विषाणू वीर्यामधूनही बाहेर पडत असल्यामुळे वीर्य बनवणाऱ्या संस्थेमार्फत होणारे वीर्य संकलन थांबवावे. वळुंची चाचणी करून रोगाकरीता नकारार्थी आलेल्या वळुंचे वीर्य संकलन करणे किंवा नैसर्गिक संयोगाकरीता वापर करावा. लम्पी स्कीन रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार थांबविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपरिषदा व महानगरपालिका यांच्यामार्फत त्यांच्या भटक्या पशुधनाचे नियमित निरीक्षण करण्यात यावे. तसेच बाधित पशुधनाची काळजी घ्यावी.

उपरोक्त कायद्याशी सुसंगत कृती न करणाऱ्या आणि कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या पशुपालक, व्यक्ती, संस्था प्रतिनिधी यांचे विरुद्ध नियमानुसार गुन्हा दाखल करणे तसेच कार्यवाही प्रस्तावित करण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील पशुधन विकास अधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात येत आहे, असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray - Uddhav Thackeray : ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा विजयी मेळावा; ठाकरे बंधू काय बोलणार? साऱ्यांचं लक्ष

Latest Marathi News Update live : मनसे - शिवसेनेचा आज मुंबईत विजयी मेळावा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य