Pune Crime : पुण्यात गुन्हेगारीचा सापळा; 40 दिवसांच्या बालकाची विक्री, 6 आरोपी अटकेत Pune Crime : पुण्यात गुन्हेगारीचा सापळा; 40 दिवसांच्या बालकाची विक्री, 6 आरोपी अटकेत
ताज्या बातम्या

Baby Trafficking Pune : पुण्यात गुन्हेगारीचा सापळा; 40 दिवसांच्या बालकाची विक्री, 6 आरोपी अटकेत

पुणे बाल तस्करी: येरवड्यात 40 दिवसांच्या बालिकेची विक्री, 6 आरोपींना अटक.

Published by : Team Lokshahi

In the Yerawada area of ​​Pune A 40-day-old Baby Girl Was Illegally Sold For Around Rs 3.5 lakh in the Yerawada Area : पुण्यातील येरवडा परिसरात अवघ्या 40 दिवसांच्या बालिकेची सुमारे साडेतीन लाख रुपयांत बेकायदेशीररीत्या विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या आई-वडिलांनी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया दत्तक न करता आपल्या चिमुरडीचा सौदा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी असे आहेत:

मिनल ओंकार सपकाळ (30) – आई

ओंकार औदुंबर सपकाळ (29) – वडील

साहिल अफजल बागवान (27, सातारा) – एजंट

रेश्मा शंकर पानसरे (34, येरवडा)

सचिन रामा अवताडे (44, सदर)

दीपाली विकास फटांगरे (32, संगमनेर) – बाळ खरेदी करणारी महिला

पोलिसांच्या तपासात असे निष्पन्न झाले की, दीपाली फटांगरे हिने कोणताही कायदेशीर मार्ग न अनुसरता या बालिकेसाठी साडेतीन लाख रुपये दिले होते. त्यामुळे मानवी तस्करीसह संगनमत करून गुन्हा केल्याचे गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.

ही घटना 2 जुलै रोजी सकाळच्या सुमारास घडली असून, पोलिसांनी 4 जुलै रोजी गुन्हा दाखल केला. या प्रकरणात भारतीय न्यायसंहितेच्या कलम 143(2), 143(3), 143(4) आणि बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र शेळके यांनी सांगितले की, प्रारंभी या बालिकेच्या अपहरणाची तक्रार पोलिसांत दाखल झाली होती. मात्र पुढील तपासात बालिका अपहृत नसून तिला विकण्यात आल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी स्वतः फिर्याद देत गुन्हा नोंदवला आणि आरोपींना अटक केली. सध्या बालिकेला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून, पोलीस याप्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

हेही वाचा...

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा