Monkey pox
Monkey pox Team Lokshahi
ताज्या बातम्या

भारत करणार जगाचे मंकीपॉक्स संकट दूर, बनवणार स्वदेशी लस

Published by : Sagar Pradhan

Monkey pox vaccine : कोरोना महामारीनंतर जगावर आता मंकीपॉक्सचे संकट उभे ठाकले आहे. या विषाणूचा परिणाम असा झाला की, सर्वत्र दहशत निर्माण झाली आहे. मंकीपॉक्सचा विषाणू 75 पेक्षा जास्त देशांमध्ये पसरला आहे. ज्या अंतर्गत आतापर्यंत जगभरातून मंकीपॉक्सची 20 हजारांहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. या देशांच्या यादीत भारताचाही समावेश आहे. अशात मंकीपॉक्सच्या संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेता भारत सरकार सतर्क झाले आहे. भारत सरकारने मंकीपॉक्सची स्वदेशी लस आणि चाचणी किट बनवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, ज्यामुळे जगासह देशाला कोरोनासारख्या मंकीपॉक्सच्या धोक्यातून बाहेर काढता येईल.(monkeypox crisis of the world, make indigenous vaccine)

दरम्यान, भारतामध्ये तयार केलेल्या कोरोना लसीने जगाला कोरोना संकटातून बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. महामारीच्या काळात भारताने जगातील अनेक देशांना कोरोनाची लस पुरवली गेली. दरम्यान, मंकीपॉक्सचा वाढता धोका पाहता भारत सरकार पुन्हा एकदा जगाचे नेतृत्व करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. या भागात मंकीपॉक्सची स्वदेशी लस आणि चाचणी किट तयार करण्याची प्रक्रिया देशात सुरू झाली आहे. ज्यामध्ये मंकीपॉक्सची स्वदेशी लस बनवण्यासाठी 8 कंपन्या पुढे आल्या आहेत.

10 ऑगस्टपर्यंत अर्ज मागवण्यात आले होते

केंद्र सरकारने हा ईओआय पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये आणला होता. ज्यामध्ये केंद्र सरकारला औषध कंपन्यांनी मंकीपॉक्स चाचणी किट आणि लस बनवायची होती. यासाठी औषध कंपन्यांना 10 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. याचा अर्थ फार्मास्युटिकल कंपन्या 10 ऑगस्टपर्यंत एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट सबमिट करू शकतील.

सीरम इन्स्टिट्यूट डेन्मार्कच्या कंपनीकडून लसींची खेप मागवत आहे

मंकीपॉक्सची लस आधीच बाजारात आहे. डॅनिश कंपनी बव्हेरियन नॉर्डिकने त्याची लस बनवली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया डेन्मार्कमधून या लसीची मागणी करत आहे. सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी पूनावाला यांनी मंगळवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की, एकदा करार पूर्ण झाल्यानंतर देशात लस आयात करण्यासाठी दोन ते तीन महिने लागतील. देशात आत्तापर्यंत मंकीपॉक्सची केवळ काही प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यामुळे स्थानिक पातळीवर लसीची मागणी करण्यासाठी SII ला काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.

भारतातच PPP मोडमध्ये तयार होणार लस आणि चाचणी किट

भारत सरकारची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) मंकीपॉक्ससाठी स्वदेशी लस आणि चाचणी किट तयार करण्याचे प्रयत्न करत आहे. या संदर्भात आयसीएमआरने खासगी कंपन्यांकडून अर्ज मागवले होते. आता पर्यंत ICMR ला विविध उत्पादकांकडून एकूण 31 अर्ज प्राप्त झाले आहेत.

ICMR च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, PPP मोडमध्ये मंकीपॉक्स विषाणूसाठी स्वदेशी लस आणि चाचणी किट विकसित करणाऱ्या विविध उत्पादकांकडून आतापर्यंत 31 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 8 कंपन्यांनी लस तयार करण्यासाठी पुढाकार दाखवला आहे, तर 23 कंपन्यांनी डायग्नोस्टिक किट विकसित करण्यासाठी अर्ज केले आहेत.

"उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रिपद हिरावून घेतलं, म्हणून..." कणकवलीत नारायण राणेंच्या सभेत 'राज'गर्जना

पत्नीसोबत अनैसर्गिक सेक्स बलात्कार नाही, तिच्या संमतीचीही आवश्यकता नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय

टी-२० वर्ल्डकपमध्ये 'इॅम्पॅक्ट प्लेयर'चा नियम नाही, दिग्गज खेळाडू म्हणाला, "कर्णधाराची वेगळी रणनीती..."

साताऱ्यात देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, " उदयनराजेंनी जी कामे हातात घेतली..."

"...म्हणून मी तुमच्याकडे मत मागायला आलोय", साताऱ्याच्या सभेत अजित पवारांनी सांगितलं खरं कारण