Mobile Hang Problem: मोबाईल सतत होतोय हँग? जाणून घ्या कारण...  Mobile Hang Problem: मोबाईल सतत होतोय हँग? जाणून घ्या कारण...
ताज्या बातम्या

Mobile Hang Problem: मोबाईल सतत होतोय हँग? जाणून घ्या कारण...

मोबाईल हँग समस्या: जाणून घ्या कारणे आणि उपाय.

Published by : Team Lokshahi

Mobile Hang Problem: आजच्या 21व्या युगात अन्न वस्त्र आणि निवारा याबरोबरच मोबाईल फोन ही सुद्धा एक जीवनावश्यक गरज बनली आहे. मोबाईलचा दैनंदिन जीवनातील वापर हा खूप मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अत्यावश्यक गरजांपैकी एक म्हणून आज मोबाईलकडे पहिले जाते. मात्र याच मोबाईलचा वापर करून अनेक सायबर क्राइमही घडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत.

आज इतर क्राइम बरोबरच मोठ्या प्रमाणावर सायबर क्राईमही वाढले आहेत. त्यात मोठा तोटा म्हणजे यामध्ये आरोपीला सहज पकडणे शक्य होत नाही. आपली माहिती मोबाईलमुळे इतरांना कळू शकते. त्यामुळे आपले मोठे नुकसान होऊ शकते. अनेकदा बँक खातेही खाली होण्याचा धोका संभवतो. अश्या परिस्थितीमध्ये तुमचा फोन जर हँग होत असेल तर तुम्ही समजून जा तुमचा फोन कोणीतरी ऑपरेट करतोय असा त्याचा अर्थ होतो. यासाठी कोणकोणते संकेत आहेत ते जाणून घेऊया...

1)स्क्रीन फ्रीझ होते – तुम्ही टच केल्यावर स्क्रीन काही क्षण किंवा खूप वेळ प्रतिक्रिया देत नाही.

2)अँप उघडायला वेळ लागतो – कोणतेही अँप उघडताना किंवा वापरताना खूप वेळ लागतो किंवा अँप क्रॅश होतो.

3)फोन रीस्टार्ट करावा लागतो – वारंवार हँग झाल्यामुळे तुम्हाला मोबाईल बंद करून पुन्हा सुरू करावा लागतो.

4)फोन खूप गरम होतो – वापरत असताना फोन जास्त गरम होतो, जे हँग होण्याचं लक्षण असू शकतं.

5)बॅटरी लवकर संपते - फोनची बॅटरी आधीपेक्षा जास्त वेगाने संपत असेल तर मेलवेअर किंवा स्पायवेअर बॅकग्राउंडमध्ये फोन हँग झाला आहे हे समजावे.

यापासून सावध राहण्यासाठी तुमचा फोन Factory Data Reset करा म्हणजे तुमच्या फोनमधील धोकादायक व्हायरस ही डिलीट केला जाईल. त्याचबरोबर कोणत्याही अज्ञात लिंक्सवर क्लिक करू नका आणि कोणालाही ओटीपी आणि पासवर्ड कोणाशीही शेअर करू नका. या आणि अश्या काही गोष्टी लक्षात ठेवून आपण जर आपला मोबाईल हाताळला तर तुम्ही तुमचे मोठे नुकसान होण्यापासून स्वतःला वाचवू शकता.

हेही वाचा...

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा