Molestation Team Lokshahi
ताज्या बातम्या

जळगावात चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

पिंपळगाव हरेश्वर पोलिसात गुन्हा दाखल, तीन संशयित अटकेत

Published by : Sudhir Kakde

जळगाव | मंगेश जोशी : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा (Pachora) तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर पाच ते सहा जणांनी सामूहिक अत्याचार (Molestation) केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. पाचोरा तालुक्यातील एका गावात 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शुक्रवारी 13मे रोजी रात्री गावातील वातावरण शांत झाल्यानंतर अज्ञात 5 ते 6 जणांनी 14 वर्षीय मुलीला उचलून नेत तिच्यावर सामूहिकरित्या अत्याचार केला.

पिडीत मुलीला पहाटे 3 वाजेच्या सुमारास अज्ञात नराधमांनी तिच्यावर अत्याचार केल्यानंतर गावातील महिलांच्या शौचालयाजवळ सोडून देत पळ काढला . अल्पवयीन मुलगी घरी आल्यावर हा प्रकार उघडकीला आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पिडीत मुलीला पाचोरा ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पिडीत मुलीचे जबाबावरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यातील गावातीलच तीन संशयित अटक करण्यात आली आहे. या तीनही संशयितांना साथ देणाऱ्या इतरांचाही पोलिसांकडून शोध सुरू आहे .

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा