ताज्या बातम्या

श्रीकृष्ण जयंतीनिमित्त 25 लाखांचा झोपाळा, 7 किलो चांदी आणि इतकं सोनं, बघ्यांची गर्दी जमली

Published by : Siddhi Naringrekar

आज श्रीकृष्णाची जयंती संपूर्ण भारतात वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. गुजरातमधील वडोदरा येथून बालगोपालांसाठी लाखो रुपयांची झोपाळा तयार करण्यात आल्याची अनोखी गोष्ट समोर आली आहे. जाणून घ्या त्याच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी. एका वृत्तसंस्थेने या मौल्यवान झोपाळ्याचे फोटो शेअर केले आहेत, ज्यात असे म्हटले आहे की हे सोने आणि चांदीपासून बनवले गेले आहे आणि त्याची किंमत सुमारे 25 लाख रुपये आहे.

हा झोपाळा वडोदरा येथील एका मंदिरात बसवण्यात आला असून त्यात सुमारे 7 किलो चांदी आणि 200 ग्रॅमहून अधिक सोन्याचा वापर करण्यात आला आहे. दान केलेल्या रकमेतून सोने-चांदीची खरेदी करण्यात आली आहे. सोन्या-चांदीने बनवलेली हा झोपाळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत असून यामुळे मंदिराला वेगळेच स्वरूप आले आहे.

गुजरात हे भारतातील अशा राज्यांपैकी एक आहे, जिथे जन्माष्टमी एका वेगळ्याच आकर्षणाने साजरी केली जाते. येथे अनेक ठिकाणी श्री कृष्णाच्या रासलीला कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

Sharad Pawar: मतदानाच्या टक्केवारीबाबत शरद पवारांकडून चिंता व्यक्त

...म्हणून १९९९ ला शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Nilesh Rane On Vinayak Raut: माजी खासदार निलेश राणेंची विनायक राऊतांवर टीका

महायुतीसह मविआमध्ये उमेदवारी अर्जासाठी लगबग

Shrikant Shinde: "राज ठाकरेंचे विचार हे शिवसेनेचे विचार"