Jitendra Awhad 
ताज्या बातम्या

जितेंद्र आव्हाडांचा छगन भुजबळांवर जोरदार हल्लाबोल

शरद पवार यांनी घरे फोडली असा आरोप होत आहे,

Published by : shweta walge

अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी भाजपसोबत सत्तेत सामील झाले आणि राष्ट्रवादीत मोठी फूट पडली.शरद पवार यांनी अजित पवार यांच्या गटाविरूद्ध दंड थोपटले आहेत. आज शरद पवार यांची छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात आज (८ जुलै) जाहीर सभा घेतली. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी छगन भुजबळांवर हल्लाबोल केला आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, शरद पवार यांनी घरे फोडली असा आरोप होत आहे, गोपीनाथ मुंडेंच्या घरात शरद पवार यांना डोकावून देखील बघितलं नव्हतं. तिनदा गोपीनाथ मुंडे यांचे भाऊ पंडीतराव मुंडे शरद पवार यांच्याकडे गेले होते आणि म्हणाले होते आम्हाला सोबत घ्या. तिन्ही वेळा साहेब नको म्हणाले. साहेब म्हणाले तुम्ही एक व्हा, हे शरद पवार यांचे शब्द होते.

पुढे ते म्हणाले, जेव्हा भुजबळ बोलतात, पवारांनी मुंडेंचे घर फोडले. मात्र भुजबळ साहेब जरा खरं सांगा की शरद पवार यांनी गोपीनाथ मुंडे यांना फोन केला होती की घर सांभाळा घर फुटत आहे. हा माणूस कोणाच्याच घरात डोकावत नाही. फक्त साहेबांना विठ्ठल म्हणून नका, त्यांना दैवत म्हणू नका. कारण विठ्ठलावरती तलवार चालवणे, बापावर घाव घालणे, हे महाराष्ट्राच्या रक्तात नाही. हे तुम्ही करु नका, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा