J&K admin
ताज्या बातम्या

J&K:अतिरेक्यांचा सुरक्षा दलावर हल्ला, एका नागरिकाचा मृत्यू

सुरक्षा दलाचा जवान आणि नागरिकाही जखणी

Published by : Team Lokshahi

जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir.)शोपियानमध्ये रविवारी दुपारी सुरक्षा दलांवर (CRPF)दहशतवादी हल्ला झाला. या गोळीबारात एका नागरिकाचा मृत्यू झाला. दोन दिवसांपुर्वी काश्मिरी पंडिताची कार्यालयात घुसून अतिरेक्यांनी हत्या केली होती.

दहशतवाद्यांनी सीआरपीएफ आणि एसओजीच्या टीमवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल गोळीबार करताना दहशतवादी जवळच्या जंगलात पळून गेले. त्यांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू आहे. गोळीबारात सुरक्षा दलाचा एक जवान आणि एक नागरिक जखमी झाल्याचे वृत्त आहे.

जम्मू- काश्मीरमध्ये गुरुवारी दहशतवाद्यांनी बडगाममधील चडूरा येथील तहसील परिसरात घुसून कश्मीर पंडित राहुल भट यांची हत्या केली. राहुल भट लिपिक पदावर कार्यरत होते. गुरुवारी दोन दहशतवाद्यांनी कार्यालयात घुसून त्यांच्यावर गोळी झाडून त्यांची हत्या केली. राहुल भट यांच्या छातीत तीन गोळ्या झाडल्या, असं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल

Mobile Hang Problem: मोबाईल सतत होतोय हँग? जाणून घ्या कारण...

ITR फाइल करताना 'या' चुका कटाक्षाने टाळा, अन्यथा होऊ शकतो लाखोंचा दंड