हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला विशेष धार्मिक आणि आध्यत्मिक महत्व असते. त्यातच प्रत्येक महिन्यातील पौर्णिमा तिथीलाही विशेष महत्त्व आहे. धार्मिक दृष्टिकोनातूनही हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, पौर्णिमेच्या दिवशी दान केल्यामुळे आणि पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्यांचे निराकरण होण्यास मदत होते. त्यासोबतच तुमच्या महत्त्वाच्या कामांमध्ये यश प्राप्त होण्यास मदत होते. त्यात ही जेष्ठ पौर्णिमा विशेष मानली जाते.
या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केले जाते. त्याच बरोबर विविध स्थानांवर दीपप्रज्वलन आणि दीपदान केले जाते. तर या दिवशी आपल्या घरात लक्ष्मीचे आगमन होते. या जेष्ठ पौर्णिमेचे आणखी एक महत्व म्हणजे या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.
आपल्या घरात लक्ष्मी सदा खेळती राहावी, आपल्या परिवारामध्ये सुख-शांती नांदावी आणि सदा आपल्या घरावर लक्ष्मीचा वास असावा, असे वाटत असेल तर जेष्ठ पौर्णिमेच्या दिवशी दीपप्रज्वलन करावे. यामुळे आपल्या कुटुंबातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते. त्याच बरोबर सुखसमृद्धीची प्राप्ती होते. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी दानधर्माचेही विशेष महत्त्व आहे. या दिवशी गरजूंना अन्न आणि कपडे दान केले जाते. या दिवशी उपवास केल्याने सर्व ईच्छा आकांक्षा पूर्ण होतात. या दिवशी पूजा केल्याने पितृदोष दूर होतो, असे मानले जाते. या दिवशी तुळशीची पूजा केली जाते. तसेच उपवास केला असता धनधान्याची काही कमी होत नाही.
ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूसोबत देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. हिंदू धर्मग्रंथानुसार, हिंदूंमध्ये ज्येष्ठ महिन्याचे विशेष महत्त्व आहे. अशावेळी या काळात जेव्हा पौर्णिमा तिथी येते तेव्हा तिचे महत्त्व अधिकच वाढते. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा यावर्षी 10 आणि 11 जून या दोन दिवशी आहे. या दिवशी वटपौर्णिमा म्हणजेच वटसावित्री व्रत हे विवाहित महिलांसाठी खास मानले जाते. या दिवशी महिला वडाला फेऱ्या मारून विवाहित महिला आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. वटपौर्णिमा, सत्यवान-सावित्री व्रत, गंगा आणि इतर नद्यांमध्ये स्नान, पूर्वजांसाठी धूप आणि ध्यान हे जेष्ठ पौर्णिमे दिवशी केले जातात. पौर्णिमेला भगवान सत्यनारायणाची कथा वाचण्याची आणि ऐकण्याची परंपरा देखील आहे.
हेही वाचा