Kolkata Crime News : तरुणीवर तिघांकडून पाशवी अत्याचार, दम लागला म्हणून lnhaler देऊन पुन्हा घृणास्पद कृत्य Kolkata Crime News : तरुणीवर तिघांकडून पाशवी अत्याचार, दम लागला म्हणून lnhaler देऊन पुन्हा घृणास्पद कृत्य
ताज्या बातम्या

Kolkata Crime News : तरुणीवर तिघांकडून पाशवी अत्याचार, दम लागला म्हणून lnhaler देऊन पुन्हा घृणास्पद कृत्य

कोलकाता बलात्कार: लॉ कॉलेजमध्ये विद्यार्थिनीवर अत्याचार, आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी.

Published by : Riddhi Vanne

Law College Girl Student Gang Raped Law College : दक्षिण कोलकात्यातील प्रसिद्ध लॉ कॉलेजमध्ये घडलेला सामूहिक बलात्काराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात 24 वर्षीय विद्यार्थिनीवर तीन आरोपींनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून आरोपींविरोधात तात्काळ आणि कडक कारवाईची मागणी होत आहे. प्राथमिक पोलिस अहवालानुसार, ही घटना 25 जून रोजी सायंकाळी 7.30 ते रात्री 10.30 दरम्यान महाविद्यालयाच्या आवारात घडली. पीडित विद्यार्थिनीने तत्काळ एफआयआर दाखल केली असून पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.

एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे की, अत्याचारादरम्यान पीडितेला पॅनिक अटॅक आला होता. मात्र, आरोपीनं तिच्यावर अत्याचार थांबवण्याऐवजी तिला इनहेलर दिला आणि तिची अवस्था काहीशी सुधारल्यावर पुन्हा अत्याचार सुरू केला. मुख्य आरोपी मनोजित मिश्रा यानेच आपल्या साथीदारांना इनहेलर आणायला सांगितल्याचं सांगण्यात येतंय. धोका ओळखून पीडित विद्यार्थिनीने स्वतःला सावरताच पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, महाविद्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद असल्यामुळे ती बाहेर जाऊ शकली नाही आणि आरोपींच्या तावडीतच अडकून राहिली.

या प्रकरणातील आणखी एक संतापजनक बाब म्हणजे, एफआयआरनुसार, इतर दोन आरोपींनी अत्याचाराचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. हा प्रकार महाविद्यालयाच्या सुरक्षा रक्षकांच्या खोलीत घडला असून तिथेच तिला जबरदस्तीने नेण्यात आलं होतं. या घटनेच्या काही दिवसांपूर्वीच आर.जी. कर वैद्यकीय महाविद्यालयात एका महिला डॉक्टरवर बलात्कार झाल्याचा प्रकार समोर आला होता. अशा सलग घटनांमुळे राज्यातील शिक्षणसंस्थांमध्ये महिलांची सुरक्षितता हा गंभीर प्रश्न बनला आहे आणि कॅम्पस सुरक्षा सुधारणांवर चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा...

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Shrimant Yuvraj Sambhajiraje Bhosale : 'अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदे'च्या प्रदेशाध्यक्षपदी श्रीमंत युवराज संभाजीराजे भोसले यांची निवड

Chhatrapati Sambhajinagar : 35 वर्षांनंतर धक्का! PSI गफ्फार खान यांचे जात प्रमाणपत्र रद्द; पुढील वर्षी निवृत्तीपूर्वीच मोठा निर्णय

Latest Marathi News Update live : बुद्धिबळ विश्वविजेती दिव्या देशमुखचं नागपूरात स्वागत

Sanjay Raut In Rajya Sabha : 'पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा'; पहलगाम हल्ल्यावरून संजय राऊतांचा मोदींवर जोरदार हल्ला