ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांची आज गिरगाव चौपाटीतील समुद्रात उतरून आंदोलन केले. हातात मागण्यांचे बॅनर आणि सरकारविरोधातील घोषणाबाजी देत हाकेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. विविधा मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या लक्ष्मण हाकेंना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले. सर्व विद्यार्थ्यांना फेलोशीप दिली जाते, तर ओबीसी विद्यार्थ्यांना का दिली जात नाही. ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे, हे सरकार सपशेल फेल ठरत आहे. अजित पवार निधी का देत नाहीत, असे अनेक प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केले. दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप करत लक्ष्मण हाके यांना उचलून थेट गाडीत टाकले.
हेही वाचा