Admin
Admin
ताज्या बातम्या

महाविकास आघाडीचे नेते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार

Published by : Siddhi Naringrekar

उदयनराजेंसह राज्यातील खासदार दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटका सीमावादावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. उदयनराजे भोसले, धनंजय महाडिक, अनिल बोंडे, पियूष गोयल आणि प्रकाश जावडेकर हे महाराष्ट्रातील खासदार अचानक पतंप्रधानांच्या निवासस्थानी दाखल झाले

राज्यातील महाविकास आघाडीचे नेते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. या भेटीत महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. भगतसिंह कोश्यारी आणि राज्यातील भाजप नेते वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करत आहेत. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणीही या बैठकीत केली जाणार असल्याचे समजते.

कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई या वादात तेल ओतण्याचं काम करत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधांनासोबत या मुद्द्यावर महाराष्ट्रातील खासदार चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

IPL 2024 : हैदराबाद आणि गुजरातचा सामना रद्द; काय आहे प्ले ऑफचं समीकरण? 'हा' संघ मारणार बाजी

"छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं असेल, तर..."; अमोल कोल्हेंनी भाजपवर डागली तोफ

देश तोडण्याची भूमिका घेणाऱ्या काँग्रेसला अमित शहांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले; "भारताचं विभाजन..."

Jayant Patil : भुजबळ साहेब नाराज हे आम्ही ऐकून आहे

Summers: उन्हातून घरी आल्यावर चुकूनही करू नका 'या' गोष्टी...