ताज्या बातम्या

Space Healthcare System : अंतराळात अंतराळवीर आजारी पडल्यावर उपचार कसे केले जातात? जाणून घ्या...

अंतराळवीर आपल्या स्पेस शटलमध्ये पोहोचल्यानंतर ते अंतराळात अचानक आजारी पडले तर अंतराळातील व्यक्ती आजाराचा कश्या प्रकारे सामना करतात, याबाबत थोडी माहिती जाणून घ्या.

Published by : Team Lokshahi

25 जुन रोजी भारतासाठी एक गौरवशाली गोष्ट घडली. नासा आणि स्पेसएक्सच्या ‘Axiom-4’ (Ax-4) मोहिमेंतर्गत शुभांशू शुक्ला यांनी भारताच्या इतिहासात एक मानाचा तुरा रोवत 4 अंतराळवीरांसह दुपारी 12 वाजून 1 मिनिटांनी अवकाशात झेप घेतली . या अंतराळातील दुनिया ही आपल्या पृथ्वीवरील दुनियेपेक्षा खूपच वेगळी आहे. आणि त्यामुळे तिथे घडणाऱ्या गोष्टीही तितक्याच वेगळ्या पद्धतीने घडत असतात.

मात्र असे असताना एखादा अंतराळवीर आपल्या स्पेस शटलमध्ये पोहोचल्यानंतर ते अंतराळात अचानक आजारी पडले, तर त्या परिस्थितीमध्ये तिथे असलेले लोक कश्याप्रकारे त्या आजाराचा सामना करतात? त्यासाठी त्यांना कोणते प्रशिक्षण दिलेले असते का? आणि अंतराळातील व्यक्ती आजाराचा कश्या प्रकारे सामना करतात, याबाबत थोडी माहिती जाणून घ्या. जर एखादा अंतराळवीर अंतराळात आजारी पडला,तर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) एक अद्ययावत वैद्यकीय किट उपलब्ध असते.

यात उलट्या, ताप, वेदनाशामक औषधे, बीपी आणि शुगर तपासण्याची मशीनं आणि इतर प्राथमिक उपचारांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी त्यामध्ये असतात.जर एखाद्याला जखम झाली तर त्या जखमेला साफ करण्याची औषध आणि अँटिबायोटिक्सही तिथे उपलब्ध असतात. अंतराळात जाणाऱ्या प्रत्येक अंतराळवीराला सीपीआर सारखे प्रशिक्षण दिलेले असते. त्यामुळे आजारपणात प्रत्येक जण स्वतःची तर काळजी घेतोच मात्र तो इतरांचीही काळजी घेऊ शकतो. अंतराळवीरांच्या टीममध्ये एक मेडिकल ऑफिसरही उपस्थित असतो. त्यामुळे आजारी व्यक्तींना हा ऑफिसर हॅन्डल करू शकतो.

अंतराळात बऱ्याच वेळा रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन काही आजार लवकर पसरू शकतात. त्यामुळे त्याबाबतीत योग्य ती दक्षता आधीच अंतराळवीरांकडून घेतली जाते. काही वेळेला पृथ्वीवरील वैद्यकीय तज्ञांशी संपर्क साधून मार्गदर्शन घेतले जाते. जेव्हा अंतराळात पाठवण्यासाठी टीमचे सिलेक्शन केले जाते त्या वेळेलाच अंतराळवीरांची वैद्यकीय चाचणी करून त्यांच्या फिटनेस बद्दलची माहिती घेतली जाते. कमकुवत किंवा वातावरणातील बदलामुळे सहज आजारी पडणाऱ्या लोकांना या टीममध्ये समाविष्ट केले जात नाही.

बऱ्याचवेळा अंतराळ स्थानकात असलेल्या वैद्यकीय किटद्वारे आजाराचे निदान केले जाते आणि त्यावर योग्य त्या उपाययोजना केल्या जातात. मात्र काही वेळेला जर एखाद्या अंतराळवीराची प्रकृती गंभीर असेल, तर त्यांना परत पृथ्वीवर बोलावले जाऊ शकते. अंतराळ स्थानकात इमरजेंसी लाईफबोट स्पेसक्राफ्ट डॉक तैनात केलेले असतात. त्याद्वारे संबंधित व्यक्तीला पृथ्वीवर पाठवले जाऊन त्यावर योग्य उपचार केले जातात. पृथ्वीपासून अंतराळस्थानक हे आपल्या कल्पनेपेक्षा ही प्रचंड लांब असल्यामुळे तिथे आजारी पडल्यानंतर स्वतःला त्या आजारातून मुक्त करण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी अंतराळवीर अंतराळात व्यायामाबरोबरच योग्य आणि संतुलित आहाराची ही काळजी घेतात.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांचा पुन्हा भाजपात प्रवेश

Shailesh Jejurikar : अभिमानास्पद! शैलेश जेजुरीकर बनले P&G चे CEO; 2026 पासून स्वीकारणार जबाबदारी

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेचा गैरवापर उघड; अपात्र लाभार्थ्यांकडून रक्कम वसूल करण्याचे आदेश

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी दिलासा! पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता ऑगस्टला मिळणार; तारीख जाणून घ्या