शिंदे-फडणवीस सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प मांडला जात आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर अमृतमहोत्सवी वर्षात देवेंद्र फडणवीस प्रथमच बजेट मांडणार मांडणार आहे. इतकेच नव्हेतर राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच आयपॅडच्या माध्यमातून अर्थसंकल्प वाचला जात आहे. आज तुकाराम बीज असल्याने भागवत धर्मातील तुकाराम महाराजांच्या चरणी दंडवत घालून अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात फडणवीसांनी केली आहे.
जन्मानंतर मुलीला 5000 रुपये देण्यात येणार आहेत, तर मुलगी पहिलीत गेल्यानंतर 4000 रुपये, सहावीत गेल्यानंतर 6000 रुपये आणि अकरावीत गेल्यानंतर 8000 रुपये देण्यात येतील. मुलगी 18 वर्षाची म्हणजे सज्ञान झाल्यानंतर तिला रोख 75,000 रुपये देण्यात येतील अशी घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली केली आहे.
मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना राबविण्यात येते. याचा लाभ राज्यातील पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना मिळणार आहे.