Pune Kidney Racket Case Team Lokshahi
ताज्या बातम्या

पुण्यात किडनी रॅकेटचा भांडाफोड; किडनी तस्करी प्रकरणी नेमली कमिटी

Published by : Shweta Chavan-Zagade

कोल्हापूर येथील महिलेला एंजटाच्या माध्यमातून पुण्यात आणून तिला पैशांचे आमिष दाखवून तिची किडनी अनोळखी रुग्णावर प्रत्यारोपित केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील रूबी हॉल क्लिनीकमध्ये हा प्रकार घडला आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर एजंटासोबतचा आर्थिक व्यवहार फिसकटल्याने संबंधित महिलेने त्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर हा तस्करीचा प्रकार उजेडात आला. दरम्यान, रूबी हॉल प्रशासनानेही या प्रकरणाबाबत पोलिसांत धाव घेत महिलेविरोधात तक्रार दिली आहे. मात्र लोकशाही न्यूजने बातमीची दखल घेतल्यानंतर कोल्हापूरच्या सारिका सुतार या महिलेच्या किडनी तस्करी प्रकारणी Regional authorisation committee for organ transplant कमिटी नेमण्यात आली आहे.

दरम्यान आरोग्य विभागाचे मुंबई आणि नाशिक येथील वरिष्ठ अधिकारी रिजनल कमिटीची चौकशी करत आहे. रुबी हॉल येथे सारिका सुतार या महिलेची रविभाऊ नामक किडनी तस्करांने 15 लाखात किडनी तस्कर करुन महीलेची फसवणुकीची बातमी सर्वप्रथम लोकशाहीने दाखवताच राज्यभरात खळबळ उडाली. त्यानंतर किडनी तस्करीचा लोकशाहीने भांडाफोड केल्यानंतर राज्य आरोग्य विभागाने पोलिस या प्रकरणी चौकशी करत आहे.

नेमकं काय घडलं?

सारिका गंगाधर सुतार ही कोल्हापूरमधील जयसिंगपूर येथे राहते. तेथे ती हॉटेलमध्ये चपात्या लाटून आपल्या दिव्यांग मुलासह दोन मुलांना सांभाळते. पतीने काही वर्षापूर्वीच तिची साथ सोडली आहे. तिच्या डोक्यावर कर्ज असल्याने व मुलांच्या भविष्याच्या चिंतेने सतत तणावात असायची. याच दरम्यान वर्षभरापूर्वी तिला एक महिला भेटली तिने तिची पैशाची गरज ओळखून रविभाऊ नावाच्या एंजंटाची ओळख करून दिली.

या एजंटने तिच्यासमोर पैशाच्या बदल्यात तिची किडनी पुण्यातील साळुंके नावाच्या व्यक्तीला विकण्याचा प्रस्ताव ठेऊन तिला 15 लाख रूपये मिळतील असे आश्वासन दिले. तसेच एका किडनीवरही तु जिवंत राहु शकते असे सांगितले. 15 लाख रूपये मिळणार म्हणून सारिका सुतार हिने देखील किडनी देण्यास होकार दर्शविला. दरम्यान वर्षभरापासून संबंधीत महिला पुण्यात येत होती. तिच्या रक्ताचा गटही किडनी आवशक असलेल्या साळुंके नावाच्या व्यक्तीसोबत जुळला.

किडनीचा हा तोंडी व्यवहार एंजटा मार्फत झाला होता. मात्र, किडनी ही जवळच्या नातेवाईकांना देण्यात येते. यासाठी सारिका हिला साळुंके या व्यक्तीची पत्नी दर्शविण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे बनावट बनविण्यात आली. त्यामध्ये सारिका यांचे नाव शोभा साळुंके असे कागदोपत्री करण्यात आले. त्यांनी तसे लेखी संबंधित किडनी प्रत्यारोपन समितीकडेही कबुल केले. गेल्या आठवड्यात याच कागदपत्राच्या आधारे सारिका हिची किडनी काढून एका किडनी आवशक असलेल्या 19 वर्षीय तरूणीला देण्यात आली. त्या तरूणीच्या आईची किडनी साळुंके यांना बसविण्यात आली. ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली

असा प्रकार आला उजेडात

या दरम्यान संबंधित रूग्ण साळुंके याची खरी पत्नीही हॉस्पीटल मध्ये तिची विचारपूस करण्यासाठी येत- जात होती. एंजटने रूग्णालयात येऊन त्यांची भेट घेतल्याचे सारिका यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. किडनी प्रत्यारोपण झाल्यानंतर सारिका हिने तिच्या बहिणीला एजंट रवीभाऊने पैसे दिले का? अशी विचारणा केली. त्यावर रवीभाऊने केवळ 4 लाख रूपये देण्याचे मान्य केले असल्याचे सांगितले. परंतु, ठरल्या प्रमाणे पंधरा लाख रूपये न मिळाल्याने त्यांच्यातील झालेला तोंडी व्यवहार फिस्कटला. त्यानंतर सारिका व नातेवाईकांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. पोलिसांनी यासंबंधी तक्रारही घेतली असून सध्या या प्रकरणाचा तपास सूरू आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक