राजकारण

सूडबुद्धीने थेट बाळासाहेबांच्या प्रतिमेवर आघात करण्याची हिम्मत; आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानापासून जवळ असलेल्या मुंबईतील वांद्रे भागातील ठाकरे गटाच्या शाखेवर मुंबई महापालिकेने मोठी कारवाई केली आहे. ही शाखा अनधिकृत असल्याचा बीएमसीने दावा करत यावर बुलडोझर चालवला आहे. यावरुन आता राजकारण तापले असून आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही गद्दार ते गद्दारच म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार शरसंधान साधले आहे.

बाळासाहेबांचे वारसदार म्हणवणाऱ्या ह्या गद्दारांचा द्वेष इतका टोकाला गेलाय की आता ठाकरेंना संपवण्याच्या सूडबुद्धीने थेट हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या प्रतिमेवर आघात करण्याची हिम्मत त्यांच्यात आलीये! द्वेषाने तुम्ही आमच्या प्रतिमा फाडाल, शाखा तोडाल, पण जनतेशी आमचं जे पक्कं नातं आहे, ते कसं संपवू शकाल, असा सवाल आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला केला आहे. तुम्ही गद्दार ते गद्दारच, असेही त्यांनी म्हंटले आहे.

चिंधी मनाने या कारवाया होत आहेत. हे देशासमोर नाही तर जगासमोर येत आहे. जगात कोणालाही विचारलं तर गद्दारी चिंधी लोकांनी केली आहे. हे शिवसैनिक आणि महाराष्ट्र सहन करणार आहे का? हे सगळं सच्चा शिवसैनिक लक्षात ठेवणार आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या ऑटो चालक वेल्फेअरच्या कार्यालयावर कारवाई करण्यात आली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही त्या ठिकाणी तैनात करण्यात आला होते. मुंबई महापालिकेची कारवाई सुरू होताच शिवसैनिकसुद्धा जमले होते.

घाटकोपरमध्ये बचावकार्यादरम्यान होर्डिंगचा लोखंडी सांगडा उचलताना पेट्रोल पंपाला आग

Bhavesh Bhide : अनधिकृत होर्डींग लावणारे भावेश भिंडे ठाकरेंच्या जवळचे असल्याचा आरोप

Daily Horoscope 15 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना मिळणार शुभ संकेत; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 15 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

मोठी बातमी! शिक्षक, पदवीधर विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलली; निवडणूक आयोगाचा निर्णय