राजकारण

लोकशाही विरुध्द खोकासुराची ही लढाई; आदित्य ठाकरेंचे शिंदे गटावर टीकास्त्र

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे गट विरुध्द शिंदे गट लढाई रंगलेली पाहायला मिळाली. ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्याकडून अर्ज भरण्याआधी मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. त्यांच्या समर्थनार्थ मोठे नेते उपस्थित झाले आहेत. यात ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेही सहभागी असून यावेळी त्यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. ही लढाई लोकशाही विरुध्द खोकासुरांची असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, ज्याप्रकारे ही निवडणूक होत आहे, त्याबद्दल प्रत्येकाच्या मनात राग आणि दु:ख आहे. एखाद्या महिलेला सतवणं किती योग्य आहे, असा सवाल त्यांनी विचारला आहे. आज सर्व निष्ठावंत सैनिक येथे आले असून महाविकास आघाडीचे घटकही आले आहेत, असेही त्यांनी म्हंटले आहे.

अशा निवडणुकींमध्ये विरोधी उमेदवार देणं योग्य नसतं. पण, त्या परिस्थितीतही खोके सरकारने जे खेळ केले. त्यातून त्यांचं काळं मन समोर आलं आहे. त्यांचे मन दिलदार नाही हे आम्ही गृहीत धरले आहे.

आम्ही लोकशाही व माणूसकीसाठी लढत आहोत. ही लढाई लोकशाही विरुध्द खोकासुरांची असल्याचे निशाणा त्यांनी साधला आहे. तसेच, निवडणूक आयोगाने आम्हाला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे हे नाव देऊन उध्दव बाळासाहेब ठाकरे हे नाव कोणीही वेगळे करु शकत नाही हे दाखवून दिले आहे. आणि मशाल ही आमच्या विजयाची मशाल आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (ठाकरे गट) या पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर करण्याचा आदेश दिला. यानुसार महापालिकेनी आज लटके यांचा राजीनामा मंजूर केला आहे. यामुळे ठाकरे गटाची मोठी अडचण दूर झाली आहे. तर, भाजप-शिंदे गटाकडून महायुतीचा उमेदवार म्हणून मुरजी पटेल यांना संधी दिली आहे. यामुळे ठाकरे गट आणि भाजपमध्ये सामना रंगणार आहे.

Devendra Fadnavis : कार्यकर्त्यांची नाराजी अनेकवेळा असते, आम्ही सगळे मिळून ती नाराजी दूर करु

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा; कांद्यावरील निर्यातबंदी हटवली

नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात; राज ठाकरेंची आज कणकवलीत सभा

Daily Horoscope 4 May 2024 Rashi Bhavishya: 'या' राशींच्या लोकांचे वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस ; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 4 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना