राजकारण

ऋतुजा लटकेंच्या विजयानंतर अंबादास दानवेंनी मानले फडणवीस यांचे आभार

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अमोल नांदुरकर | अकोला : अंधेरी पूर्व निवडणुकीमध्ये ऋतुजा लटके यांचा दणदणीत विजय झाला आहे. यावरुन मात्र सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. भाजपामुळेच शिवसेनेचा विजय झाल्याचा दावा सत्ताधारी करत आहेत. अशातच, शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर आभार मानले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.

अंधेरी पूर्व निवडणुकीमध्ये ऋतुजा लटके यांचा मोठा विजय झाला. यावर भाजपकडून श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. यातच आता भाजप नेत्यांकडून या विजयानंतर फडणवीसांचे आभार मानावे, असे वक्तव्य करण्यात येत आहेत. याला प्रत्युत्तर अंबादास दानवे यांनी दिले आहे. ते म्हणाले की, खरोखरच फडणवीसांचे आभार आम्ही मानलेच पाहिजे की त्यांनी आमचं चिन्ह, आमच्या पार्टीचे नाव गोठवलं. नोटांचे मताधिक्य ईव्हीएममध्ये वाढवलं. खरोखरच त्यांचा आम्हाला संपवण्याचे काम करण्याचा प्रयत्न केला, असा खोचक टोला दानवेंनी लगावला आहे.

दरम्यान, भाजप नेते आशिष शेलार यांनी भाजपाच्या मदतीमुळे ऋतुजा लटके यांचा अंधेरी पूर्व मध्ये विजय. ऋतुजाताईंचे अभिनंदन. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाकप डझनभर पक्षांनी पाठिंबा देऊन ही शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला ना मतदान जास्त झाले, ना मतं जास्त मिळाली. भाजपाने निवडणूक लढवली असती तर यांचा पराभव निश्चित होता, असे त्यांनी म्हंटले होते.

पंतप्रधान मोदींचा इंडिया आघाडीला थेट इशारा, साताऱ्यात म्हणाले, "मी जिवंत आहे, तोपर्यंत..."

IPL मध्ये जॅक्सने दाखवली 'विल'पॉवर! ख्रिस गेलचा दहा वर्षांपूर्वीचा 'हा' विक्रम मोडला

Rahul Shewale: 'कॉंग्रेसच्या विचारांचा पराभव करायचायं' अर्ज दाखल करण्यापूर्वी शेवाळेंची प्रतिक्रिया

Harbour Local: हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत; CSMT जवळ लोकलचा डबा घसरला

सोलापूरमध्ये PM नरेंद्र मोदींचं 'इंडिया'आघडीवर शरसंधान, म्हणाले; "देशाला भ्रष्टाचार, दहशतवादात..."