Sanjay Raut
Sanjay Raut  Team Lokshahi
राजकारण

अफजल खान कबरीजवळील अतिक्रमण पडल्यानंतर राऊतांनी केले राज्य सरकारचे कौतुक

Published by : Sagar Pradhan

शिवप्रताप दिनीच जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने मोठी कारवाई करत प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खान कबरीजवळील अतिक्रमण पाडले आहे. यावरून विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. त्यावरून जामीनावर बाहेर असलेले शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

अफजल खान कबरीजवळील अतिक्रमण राज्यसरकारने हटवले आहे. त्यावरूनच आता राज्यभरात राजकारण चांगलेच तापले आहे. त्यावरच जामिनावर बाहेर असलेले संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या निणार्यावर बोलताना राज्य सरकारचे त्यांनी कौतुक केले आहे. अफजल खान यांच्या कबरीजवळील अवैध अतिक्रमण हटवले तर ते चांगलेच झाले. असे एका शब्दात त्यांनी उत्तर दिले.

गुरुवारी ( १० नोव्हेंबर २०२२ ) सकाळी स्थानिक प्रशासनाकडून जेसीबीच्या सहाय्यानं अनधिकृत बांधकाम पाडण्यास ( Afzal Khan Kabar ) सुरूवात करण्यात आली आहे. त्यावेळी अफजल खानाच्या कबरीच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. अनधिकृत बांधकाम पाडताना माध्यम प्रतिनिधी आणि स्थानिकांना कबर परिसरापासून ६ ते ७ किलोमीटर दूर हटवण्यात आले. अफजल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम पाडण्याचे कोर्टानं दिले होते . कोर्टाच्या आदेशाची आता प्रशासनाकडून अंमलबजावणी करण्यात आली आहे.

"पहिल्या चार टप्प्यातच आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा सुफडा साफ केला "; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा दावा

मोठी बातमी! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

World Hypertension Day 2024 : 'जागतिक उच्च रक्तदाब दिवस' कधी आणि का साजरा केला जातो?

"४ तारखेनंतर टरबूजचा भाव उतरणार आहे"; उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका

Daily Horoscope 17 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना साडेसातीचाही होणार त्रास; पाहा तुमचे भविष्य