राजकारण

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन अजित पवार आक्रमक; विधानसभा अध्यक्षांनी मध्येच थांबवले

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नागपूर : हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले असून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन शिंदे-फडणवीस सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, विरोधी पक्षनेते अजित पवार हे कर्नाटक सीमावाद सभागृहात बोलत असताना विधानसभा अध्यक्षांनी त्यांना मध्येच अडवलं. यामुळे सभागृहात एकच गोंधळ निर्माण झाला.

अजित पवार म्हणाले, गृहमंत्री अमित शहा यांनी सीमाभागावर वादाबद्दल दिल्लीत बैठक बोलावली होती. मुळात सीमाभागाच्या मुद्यावर कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. 6 डिसेंबरला चंद्रकांत पाटील आणि शंभुराजे देसाई सीमाभागात जाणार होते. पण, महापरिनिर्वाण दिन असल्यामुळे त्यांनी टाळले. त्यानंतर कर्नाटकमध्ये कुणाला अडवणार नाही, असे अमित शहांसमोर ठरले होते. मग, आज आमदारांना कर्नाटकने का रोखलं, हे अजिबात आपण खपवून घेऊ नये, असे त्यांनी म्हंटले आहे.

अजित पवार कर्नाटकच्या मुद्यावर बोलत असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मध्येच थांबवले. अजित पवार यांनी मांडलेला मुद्दा हा समजला आहे, पुढच्या कामकाजाकडे जाऊ या, बसा जरा खाली बसा, असे विधानसभा अध्यक्षांनी आमदारांनी सांगितले. त्यानंतर सभागृहात विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत धिक्कार असो, अशा घोषणा दिल्या.

Beed: बीडमध्ये चंदन तस्करी; निवडणुकीच्या धामधुमीत दोन कोटींचे चंदन जप्त

Eknath Shinde On Wadettiwar: वड्डेटीवाराचं डोकं फिरलं आहे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जोरदार टीका

Shantigiri Maharaj: नाशिक लोकसभेतून माघारीचा अखेरचा दिवस, शांतीगिरी महाराज निवडणूक लढण्यावर ठाम

Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी-गुजराती वाद? घाटकोपरमधील गुजराती बहुल सोसायटीतील प्रकार

दिंडोरी लोकसभेतून अखेर जे पी गावित यांची माघार; म्हणाले...