राजकारण

माजी मुख्यमंत्री इतकं खोटं बोलताहेत याचे आश्चर्य वाटते : अजित पवार

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : महापुरुषांचा होणारा सततचा अपमान, सीमा प्रश्नावरील वाद व राज्याबाहेर जाणारे प्रकल्प या अनुषंगाने महाविकास आघाडी सरकारचा हा मोर्चा असणार असून हा 'महाराष्ट्रद्रोही' विरोधात हल्लाबोल असल्याची माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद संदर्भात गृहमंत्री अमित शाह यांना निवेदन दिले आहे, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

शांतता पूर्ण होण्याअगोदरच भडका होईल, असे विधान कर्नाटक मुख्यमंत्री बोम्मई करत आहेत. प्रक्षोभक विधाने केली जात आहेत. केंद्रसरकारने या दोन राज्यातील सीमा वादावर तोडगा काढला पाहिजे, असेही अजित पवार म्हणाले. कर्नाटक आणि गुजरात राज्यात जाऊ इच्छिणाऱ्या गावकर्‍यांना विश्वास द्यायला कमी पडले आहे. निधी द्यायला कमी पडले आहे हे सरकारचे अपयश आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.

सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन व भत्ते खाजगी बँकांकडे परवानगी देण्याचा विषय झाला होता. परंतु, अडचणी निर्माण होणार हे लक्षात आल्यानंतर तो रद्द करण्यात आला होता. मात्र आता कर्नाटक बँकेत जमा करण्याची परवानगी देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आम्ही दिलेली नाही देवेंद्र फडणवीस साफ खोटं बोलत आहेत. माजी मुख्यमंत्री इतकं खोटं बोलत आहेत. याबाबत आश्चर्य वाटते, असेही अजित पवार यांनी म्हंटले आहे.

एकीकडे सीमाभागात आगपाखड केली जात आहे आणि दुसरीकडे तुम्ही त्यांचे लांगूलचालन करताय हे ठिक नाही. ७ डिसेंबरला एका दिवसात परवानगी मिळाली कशी याची माहिती माहितीच्या अधिकारात मागवणार असल्याचेहीअजित पवार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, तर, हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीवर बोलताना अजित पवार यांनी जगातील सर्वात मोठ्या पक्षाच्या अध्यक्षांना आपले राज्य टिकवता आले नाही ही नामुष्की आहे, असा टोला लगावला आहे.

Megablock: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 15 दिवस मेगाब्लॉक; तर काही गाडया रद्द

साताऱ्यातील मिनी काश्मीर आणि महाबळेश्वरमध्ये बरसला अवकाळी पाऊस

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."