राजकारण

अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत; शरद पवारांसमोर कार्यकर्त्याची बॅनरबाजी

Published by : Shweta Shigvan-Kavankar

बारामती : दिवाळीनिमित्त पवार कुटुंबीयांना भेटून शुभेच्छा देण्याकरिता राज्यभरातून नागरिक बारामतीतील गोविंद बागेत पाडव्याच्या दिवशी येत असतात. दोन वर्षानंतर गोविंद बागेत पाडवा साजरा होत आहे. पवार कुटुंबियांनी नागरिकांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छांचा स्वीकार केला. यावेळी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे उपस्थित होते. परंतु, अख्या कार्यक्रमात चर्चा फक्त अजित पवारांची होती. कारण मुख्यमंत्री अजित पवार व्हावेत म्हणून एका कार्यकर्त्याने गोविंद बागेत बॅनरबाजी केली.

दिवाळी पाडव्यानिमित्त बारामती तालुक्यातील माळेगाव येथे शरद पवार यांच्या निवासस्थानी भेटण्यासाठी अलोट गर्दी झाली आहे. यातच बारामती तालुक्यातील काटेवाडीच्या बाळू जनार्दन भिसे या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने हातात भावी मुख्यमंत्री अजित पवार असा मजकूर असलेला बॅनर हातात घेऊन गोविंदबागेत आला होता. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. स्वतः अजित पवार यांनीही बॅनरवाल्या कार्यकर्त्यांला हासून दाद दिली व बॅनर छान केल्याचे सांगत दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या असल्याचे बाळू भिसे यांनी सांगितले.

"छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं असेल, तर..."; अमोल कोल्हेंनी भाजपवर डागली तोफ

देश तोडण्याची भूमिका घेणाऱ्या काँग्रेसला अमित शहांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले; "भारताचं विभाजन..."

Jayant Patil : भुजबळ साहेब नाराज हे आम्ही ऐकून आहे

Summers: उन्हातून घरी आल्यावर चुकूनही करू नका 'या' गोष्टी...

India Alliance Meeting : बीकेसीत इंडिया आघाडीचं शक्तिप्रदर्शन, मविआ उमेदवारांच्या प्रचारासाठी होणार सभा