राजकारण

अब्दुल सत्तारांची आमच्याकडे सर्व रेकॉर्डिंग; दानवेंचा गर्भित इशारा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

सचिन बडे | औरंगाबाद : अब्दुल सत्तार हे शिवसेनेमुळे निवडून आले आहेत. शिवसेनेमुळे त्यांना काय काय फायदा झाला, याची आमच्याकडे सर्व रेकॉर्डिंग आहे, असा गर्भित इशारा शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी दिला आहे. शिवसेना (ठाकरे गट) आदित्य ठाकरेयांचा सोमवारी सिल्लोड येथे शिवसंवाद यात्रा घेणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सिल्लोड येथे जाऊन यात्रेच्या तयारीची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.

मागील काही दिवसांपासून अब्दुल सत्तार आदित्य ठाकरेंवर सातत्याने टीका करत आहेत. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवानगी दिली तर मी राजीनामा देईल. पण, चंद्रकांत खैरे आणि आदित्य ठाकरे यांनी माझ्याविरुद्ध निवडणूक लढवून सिल्लोडमधून विजयी होऊन दाखवावे, असे आव्हान सत्तारांनी दिले होते. यानंतर आता आदित्य ठाकरे थेट सत्तारांच्या बालेकिल्ल्यात जाणार आहेत. यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, आमची टस्सल कुणाशी नाही. सिल्लोड येथे आदित्य ठाकरे यांची पूर्वनियोजित सभा आहे. आदित्य ठाकरे यांच्या मेळाव्याला आम्हाला माणसे गोळा करण्याची गरज नाही, माणसे जमा करण्याचा धंदा हा त्यांचा आहे, असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे. तर, अब्दुल सत्तार हे शिवसेनेमुळे निवडून आले आहेत. शिवसेनेमुळे त्यांना काय काय फायदा झाला, याची आमच्याकडे सर्व रेकॉर्डिंग आहे, असे त्यांनी म्हंटले आहे. तर,

दरम्यान, शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात सोमवारी आदित्य ठाकरे सभा घेणार आहेत. तर, याठिकाणी आदित्य ठाकरेंविरोधात श्रीकांत शिंदेही मैदानात उतरले असून सोमवारीच म्हणजेच 7 नोव्हेंबर रोजी सिल्लोड दौरा करणार आहेत. यामुळे महाराष्ट्रातील आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्रांमध्ये सामना रंगण्याची चिन्हे आहेत. कोण काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Daily Horoscope 4 May 2024 Rashi Bhavishya: 'या' राशींच्या लोकांचे वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस ; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 4 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

'आमचं सरकार आलं तर 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवू' राहुल गांधींची मोठी घोषणा

Garlic: उन्हाळ्यात 'या' लोकांनी लसूण खाणे टाळावे

Cold Water: माठातील पाणी फ्रिजसारखं गार कसं करायचं? जाणून घ्या...