Ambadas Danve
Ambadas Danve Team Lokshahi
राजकारण

आव्हान स्वीकारा, मग कळेल दिवा कोण आणि सूर्य कोण? अंबादास दानवेंचे बावनकुळेंना प्रत्युत्तर

Published by : Sagar Pradhan

राज्यात सध्या राजकारण खूपच तापलेलं आहे. अशातच राजकीय मंडळीत जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु आहे. औरंगाबाद दौऱ्यावर असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यावरच आता राज्याचे विरोधीपक्ष नेते शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राज्यातील भाजप म्हणजे विझलेला दिवा आहे, अशी घणाघाती टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.

काय म्हणाले अंबादास दानवे?

मनमाड येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत असताना दानवे म्हणाले की, अमित शहा जर सूर्य असतील तर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका महिन्यात निवडणुकीला सामोरे जाण्याचे दिलेले आव्हान स्वीकारावे, आधी उद्धव ठाकरे यांनी एका महिन्यात निवडणुका घेण्याचे दिलेले आव्हान स्वीकारा. मग कळेल दिवा कोण आणि सूर्य कोण? निवडणुका घेण्यासाठी सरकार वारंवार चालढकल करत असून पळ काढत आहेत. उद्धव ठाकरे यांचे आव्हान भाजप पेलू शकत नाही म्हणून असे बेताल वक्तव्य करत असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. एक दिवा काय करू शकतो हे बावनकुळेंना सांगण्याची गरज नाही, असा टोला त्यांनी बावनकुळे यांना बोलताना लगावला आहे.

पुढे बोलत असताना त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर सुद्धा जोरदार हल्ला चढवला आहे. ते म्हणाले की, ज्या शिवसेनेने राणे यांना भरभरून दिले त्यांच्यावर टीका केली. ही नारायण राणे यांची नमकहरामी असल्याचा बोलत त्यांनी बोचरी टीका केली आहे.

उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रत्युत्तर, म्हणाले...

उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

महाविकास आघाडीतील सांगलीच्या वादावर रोहित पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचा महायुतीला पाठिंबा

Daily Horoscope 29 April 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचा शुभ काळ होणार सुरु; पाहा तुमचे भविष्य