राजकारण

देशात आता डोळा मारण्यासाठी अजित पवार प्रसिध्द; शिंदे गटाच्या नेत्याचे टीकास्त्र

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नागपूर : सध्या भारतात दोन जण डोळा मारण्यासाठी प्रसिद्ध आहेत एक म्हणजे राहुल गांधी. मिठी मारून डोळा मारणे आणि दुसरे म्हणजे विरोधी पक्ष नेता अजित पवार. बजेटवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत असताना अजित दादांनी ज्या पद्धतीने डोळा मारला ते सगळ्यांना माहिती आहे, अशी खोचक टीका खासदार अनिल बोंडे यांनी केली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जर जिवंत असतील तर कुणाची अशा पद्धतीने डोळा मारण्याची हिंमत झाली असती का? असाही प्रश्न खासदार त्यांनी असा प्रश्न उपस्थित केलेला आहे.

अवकाळी पावसाने शेतकऱ्याचं मोठं नुकसान होते. तेव्हा महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना काहीच दिल नव्हतं. मात्र, शिंदे फडणवीस सरकारने मागच्या वेळी एनडीआरएफच्या नियमांपेक्षा जास्त मदत केली. आता सुद्धा पंचनामे करण्याचे आदेश दिले आणि नुकसान भरपाई देण्यात येईल. शेतकरी आत्महत्या होत आहे हे थांबविण्यासाठी त्याच उत्पादन वाढविण्यासाठी मोदी सरकारने प्रयत्न केला. त्याला यश येत आहे, असे अनिल बोंडेंनी सांगितले आहे.

अजित पवार शेतकऱ्यांना 6 हजार देणार असल्यावर म्हणाले की घरात 4 लोक असतील तर त्याची रोजी 3 रुपये होणार हा शेतकऱ्यांचा अपमान नाही का? मात्र यांनी सरकार असताना शेतकऱ्यांना दमडी तरी दिली का? असा प्रश्न आहे. विरोधकांना सुदधा या बजेटबद्दल चांगलं बोलावं लागलं अजित दादाना डोळा मारावं लागला. देशात आता डोळा मारणारे दोन जण झाले एक अजित पवार आणि दुसरे राहुल गांधी. अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरे बोलत असताना अजित पवार डोळा मारल्याने एवढा अपमान झाला आणि शिवसैनिकांना काहीच वाटले नाही. मी पण शिवसैनिक होतो, अशी टीका त्यांनी केली आहे.

एक रुपयात नोंदणी करा तुमचे विम्याचे हफ्ते सरकार भरणार हे कुठल्याच राज्यात झालं नाही. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात मदत झाली नाही. नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50 हजार रुपये देण्याचं महाविकास आघाडीने कबुल केलं होतं. मात्र दिले नाही. आता आमच्या सरकारने ते पुन्हा सुरू केलं. प्राकृतिक शेतीला सरकारने महत्व दिले त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. या अर्थसंकल्पावर विरोधकांना विरोधात सुद्धा बोलता येत नाही म्हणून ते आता म्हणतात शेतकऱ्याचं वीज बिल वाढणार मात्र तसं नाही आता सोलर उर्जा वाढविली जात आहे, असेही अनिल बोंडेंनी म्हंटले आहे.

Cold Water: माठातील पाणी फ्रिजसारखं गार कसं करायचं? जाणून घ्या...

Kalyan Loksabha : कल्याण लोकसभा मतदारसंघात ट्विस्ट, ठाकरे गटाच्या रमेश जाधवांचा उमेदवारी अर्ज दाखल

Abhijeet Patil: अभिजीत पाटील यांना दिलासा, विठ्ठल कारखान्यावरील जप्तीची कारवाई मागे

2017मध्ये राष्ट्रवादीचं काय ठरलं होतं? सुनिल तटकरे यांनी लोकशाहीला थेट सांगितलं

निवडणुकीदरम्यान 'डीप फेक' रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश