राजकारण

'आघाडीचे सोळा झाले गोळा तरी भाजपाशिवाय जिंकता येणार नाही'

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा काल निकाल लागला आहे. यामध्ये शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा मोठा मताधिक्याने विजय झाला आहेत. परंतु, या निवडणुकीत नोटाला अधिक मत पडली आहेत. यावरुन आज भाजपचे नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे. शेलारांनी ट्विटरवरद्वारे शिवसेनेवर (ठाकरे गट) निशाणा साधला आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीने बरेच काही स्पष्ट केलेय, असे त्यांनी म्हंटले आहे.

आशिष शेलार म्हणाले की, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीने बरेच काही स्पष्ट केलेय. भाजपा समोर आघाडीचे सोळा झाले गोळा तरी भाजपा शिवाय जिंकता येणार नाही. मतदानाची अत्यल्प टक्केवारी आणि नोटा यातून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटावरचा मुंबईकरांचा रोष समोर आला आहे. या तिघाडीला 70 टक्के मतदारांनी नाकारले. 2014 नुसार विचार केला तर आघाडीच्या उमेदवारांना 90 हजार मते मिळायला हवी होती तसे घडले नाही. एक पक्ष दुसऱ्या पक्षाला मतदान करीत नाही. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला मुंबईकरांचा मतदान करायला ही विरोध आणि मतपेटीतूनही प्रचंड विरोध आणि रोष समोर आला आहे, अशी टीका त्यांनी शिवसेनेवर केली आहे. यामुळे भाजपासाठी मुंबई महापालिका विजयाचे चित्र स्पष्ट झाले, असेही त्यांनी म्हंटले आहे.

तसेच, जे गोळा झालेत सोळा त्यांना कवी अशोक थोरात यांच्या शब्दात आम्ही सांगतो. आव्हान माझे तुम्हांला चालून या माझ्यावरी धैर्याची कट्यार माझी पाजळेन तुमच्यावरी संकटानो सावधान, गाफील मी असणार नाही, असा इशाराही शेलारांनी दिला आहे.

दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटकेंना एकूण ६६ हजार २४७ मतं मिळवली. नोटाला १२ हजार ७७८ मतं मिळाली आणि १ हजार ५६९ मतांसह राजेश त्रिपाठी तिसऱ्या स्थानावर राहिले. तरह, नोटाला दहा हजारांपेक्षा अधिक मते मिळाली आहेत. यामुळे निवडणुकीत ऋतुजा लटके विरुध्द नोटा असा सामना रंगला होता. तर, निवडणुकीपुर्वीच शिवसेना (ठाकरे गट) नेते अनिल परब यांनी काही लोकांना नोटा दाबण्यासाठी नोटा दिल्या जात आहेत, असा आरोप केला होता.

"छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान करेल, त्याला गुडघे टेकायला लावल्याशिवाय राहणार नाही"; नाशिकमध्ये उद्धव ठाकरे कडाडले

"इंडिया आघाडीच्या नादाला लागून उबाठाने पाकिस्तानची हुजरेगिरी केली"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Daily Horoscope 16 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना नोकरी-व्यवसायात मिळणार लाभ; पाहा तुमचे भविष्य

"काँग्रेस फक्त हिंदू-मुस्लिमांचं राजकारण करतं"; कल्याणच्या सभेत PM मोदींची तोफ धडाडली

दिनविशेष 16 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना