राजकारण

अविनाश जाधवांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Published by : Siddhi Naringrekar

राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी टोलवर भाष्य केलं आहे. राज ठाकरे म्हणाले की, टोल हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा स्कॅम आहे. सगळ्या सरकारने टोलमुक्तीच्या फक्त थापा मारल्या. फडणवीस टोलवरुन धादांत खोटं बोलतात. टोलचा पैसा जातो कुठे? प्रत्येक टोलनाक्यावर मनसैनिक उभे राहतील. लहान वाहनांकडून टोल घेतल्यास टोलनाका जाळून टाकू. असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.

राज ठाकरेंनी असा इशारा दिल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मनसैनिक पनवेल, मुलुंडच्या टोलनाक्यावर हजर झाले आहेत. टोल न भरताच चारचाकी वाहनं मनसेकडून सोडण्यात येत होती. अविनाश जाधव यांनी मुंबईतील मुलुंड टोलनाक्यावर धाव घेत आंदोलन सुरु केलं. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात मनसेचं आंदोलन सुरु होते. देवेंद्र फडणवीसांचा जुना व्हिडीओ दाखवत मनसैनिकांकडून वाहनं विनाटोल सोडण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर आता अविनाश जाधवांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

संजय राऊत यांच्यावर अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रोहित पवार यांनी ट्विट करत परळी तालुक्यात बोगस मतदान झाल्याचा केला आरोप; म्हणाले...

Uddhav Thackeray : 4 जूनला आपल्या देशातलं जुमलापर्व संपतं आहे

काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

ईशान्य दिल्लीत काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण